ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आमचं गाव आमचा विकास कृती आराखडा तालुकास्तरीय प्रशिक्षण उत्साहात

December 14, 202016:06 PM 96 0 0

जालना (प्रतिनिधी) राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेअंतर्गत आमचे गाव आमचा विकास ग्रामपंचायत कृती आराखडा दोन दिवशीय प्रशिक्षण जालना पंचायत समिती अंतर्गत उत्साहात संपन्न झाले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दि. 11 डिसेंबर रोजी गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून यशदाचे प्रविण प्रशिक्षक हरिभाऊ सिरसाठ, एनआयआरडीचे मास्टर ट्रेनर मिलींद सावंत, विस्तार अधिकारी व्हि. डी. चव्हाण, एम. एस. जायभाये, धावेडीचे सरपंच श्री विटेकर यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविकात गटविकास अधिकारी श्री कुलकर्णी यांनी पंचायत समिती स्तरावर सदर प्रशिक्षण ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी आयोजीत करण्याचे सांगुन ग्रामसेवक, सरपंच, ग्रामविकास अधिकारी, प्रशासक यांना प्रशिक्षण देऊन आमचे गाव आमचा विकासाचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे सांगीतले.

यावेळी मार्गदर्शन करतांना यशदा प्रशिक्षक हरिभाऊ सिरसाठ यांनी 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत ग्रामस्थरावर आराखडा तयार करत असतांना शासनाकडून सुचविण्यात आलेल्या बाबींचे तंतोतंत पालन करून उत्कृष्ट असा ग्रामविकास आराखडा तयार करण्यासाठी प्रशिक्षणार्थींनी नियोजन करून अमलबजावणी करावी असे सांगीतले. तर सदर आराखडा उत्कृष्टपणे तयार करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने सुचविलेल्या शास्वत विकास मुल्यांची सविस्तर माहिती राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थेचे प्रशिक्षक मिलींद सावंत यांनी देतांना दारिद्रय निर्मुलन, भुकेचे उच्चाटन, शास्वत पायभूत सुविधा, हर घर नल, सबके साथ सबका विकास यासह शास्वत व स्वच्छ उर्जा उपलब्धतेसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी सर्व समावेशक पद्धतीने आराखडा तयार करतांना लोककल्याणकारी योजनांना प्राधान्य देतांना समाजातील शेवटच्या घटकाचा समावेश आराखड्यात करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले. तर विस्तार अधिकारी श्री जायभाये यांनी घन-वन लागवड, रोजगार हमी योजना यासह विविध कागदपत्रांची पुर्तता करतांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तर रोजगार निर्मितीसाठी महिला व बालके यांच्यासह दिव्यांगांच्या योजनांचा समावेश आराखड्यामध्ये करण्याबाबत विस्तार अधिकारी श्री चव्हाण यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. तसेच भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या वतीने पिण्याचे शुद्ध आणि स्वच्छ पाणी ग्रामस्थांना मिळण्यासाठी भूजलाच्या निरिक्षण विहीरींची सातत्याने देखभाल करणे आवश्यक असल्याचे सांगून पिण्याच्या पाण्या बाबत आरोग्य आणि शिक्षणाबाबत सर्व संबंधीतांना प्रशिक्षण देणार असल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानीक श्री चव्हाण यांनी सांगीतले.
यावेळी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस पी. एस. वाघ, पतसंस्थेचे चेअरमन जी. पी. कुरंगळ, तालुकाध्यक्ष आर. यु. गोरे, माजी जिल्हाध्यक्ष पी. बी. पवार यांच्यासह ग्रामसेवक, सरपंच, प्रशासक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचायत समितीचे कर्मचारी अधिकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *