जालना/ बदनापुर/ शेलगाव ( प्रतिनिधी) : औरंगाबाद येथील इंड्रेस हाऊसर कंपनीतर्फे शेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास प्राणवायू साठी उपयुक्त असलेली ऑक्सीजन कॉन्संट्रेटर मशीन शुक्रवारी ( ता. १८) भेट देण्यात आली. आरोग्य केंद्रात झालेल्या छोटेखानी सोहळ्यास कंपनीचे व्यवस्थापक गणेश कारोडकर, लक्ष्मण मदन ,अभिजीत वैद्य, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा पनाड, हमीद कादरी, यांची उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील गरोदर माता, बालके व रुग्णांची प्राणवायू अभावी हेळसांड होऊ नये म्हणून कंपनीतर्फे अल्पसा मदतीचा हात देत असल्याचे कंपनीचे व्यवस्थापक गणेश कारोडकर यांनी स्पष्ट केले.
हवेतून प्राणवायू निर्माण करत रुग्णांना गरजेनुसार प्राणवायूचा पुरवठा सदर मशीन द्वारे होत असल्याचे लक्ष्मण मदन यांनी सांगितले.
आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा पनाड यांनी ग्रामीण भागातील रुग्णांना सदर मशीन चा फायदा होईल .असे सांगून मशीन दिल्याबद्दल कंपनीचे आभार व्यक्त केले.
या वेळी अरुण गोरवाडकर ,भूपेंद्र पाठक,सुनील महेश्वर,प्रविण पारधे,संजय वानखेडे,प्रदीप देशपांडे,निकाळजे,राठोड,सुधाकर कांबळे, अंड निवृत्ती मदन
यांच्या सह आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply