ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भारती इंग्लिश स्कूल चा पालखी सोहळा संपन्न

July 13, 202216:18 PM 17 0 0

नांदेड  : आषाढी एकादशीचा मोहोत्सव टाळी वाजवून  ताल धरावा अन् चालावी वाट ती  पंढरीची वारी, मग ती आषाढीची असो वा कार्तिकीची, या दोन वाऱ्या म्हणजे वारकऱ्यांचा मोक्षमार्ग. पावसाळा सुरु झाला की आषाढातील पालख्यांचे वेध लागतात. आषाढातली ही एकादशी आणि तिची वारी हे वारकर्‍याचं व्रत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव आहे.
याचेच अनूकरण करत भारती इंग्लिश स्कूल, पिंपरखेड या.हदगाव जि.नांदेड येथिल शाळेमध्ये कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधी नंतर नियमित प्रमाणे यावर्षी आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले.इयत्ता नर्सरी ते पाचवीच्या वर्गातील चिमुकल्या विद्यार्थीनीं वारकरी वेशभूषा करून दिंडीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी घेतला. गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळाला गंध, डोक्यावर तुळस, हातात भगव्या पताका घेऊन विठ्ठलाच्या नामघोषाच्या गजरात पालखी सोहळा संपन्न केला. टाळ, मृदुंग वाद्यवृंदाने परिसर दुमदुमून गेला. याचबरोबर अभंग आणि भजन गात विद्यार्थ्यांनी रिंगण तसेच फुगडीचा आनंद लुटला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रूचिरा बेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी सौ.कलपना चव्हाण,सौ.रिना आमदरे
कु.शितल वाघमारे, नंदकुमार हदरगे, सौरभ चव्हाण आणि जनाबाई पचलिंगे यांनी परिश्रम घेतले. अशी माहिती पत्रकार हिरकणीस देण्यात आली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *