ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पंचांग या लघुचित्रपटाचा लोकार्पण सोहळा

September 5, 202213:05 PM 6 0 0

नांदेड – येथील विविध कलाकारांनी साकारलेला ‘पंचाग’ या लघुचित्रपटाचा लोकार्पण सोहळा शहरातील मालेगाव रोडस्थित हाॅटेल तरोडा येथे मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी रोहन पंडित (राडा फेम), गोविंद वाघमारे, महेश अन्नापुरे, अभिनेते संजीव स्वामी, प्रल्हाद घोरबांड, मामीडवार नागनाथ (गीतकार), शंकर धोंगडे,(गायक), कवी शरदचंद्र हयातनगरकर, जेष्ठ कवी बिंगेवार, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, गोविंद महाराज यांची उपस्थिती होती. 
     पंचांग या  शॉर्टफिल्म चे निर्माते कवी तथा दिग्दर्शक, कलाकार पांडुरंग कोकुलवार आहेत. पटकथा जगन्नाथ शिंदे यांची असून दिग्दर्शक महेश अन्नापुरे आहेत.  गोविंद वाघमारे यांचे निर्मिती व्यवस्थापन आहे, तर चित्रीकरण प्रफुल्ल यांनी केले.
सदरील फिल्मचे आकर्षक संकलन समीर सोनसळे यांनी केले असून सुमधूर संगीत पुंडलीक इंगळे यांनी दिले आहे.  कलाकार म्हणून गोविंद जोशी, रमेश गिरी, अजयराज राठोड यांच्यासह संजीव स्वामी, तुळशीराम कांबळे, आकाश कोथिंबीरे, प्रा. संजय वाघमारे, डाॅ. अर्चना धोटे, प्रल्हाद घोरबांड, पांडुरंग कोकुलवार, गजानन बेळगे,
https://youtu.be/Tj8lNPRE9q8
निरज मुदिराज, बबलू कळसे, दत्ता तालीमकर, मीनाक्षी मुळे, दादाराव बुक्तरे, निशा पंडीत, आकाश भालेराव, गंगाधर ईंगळे यांची प्रमुख भूमिका असलेला आणि इतर जवळपास ५० कलाकार असलेल्या या लघुचित्रपटाचे आकाश प्रकाशन युट्युब चॅनलवर प्रसारित करण्यात आले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *