ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अजंता बुद्ध विहारात धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त पंचशील ध्वजा रोहन करण्यात आले

October 14, 202119:07 PM 15 0 0

जालना वार्ता: आज १४ ऑक्टोबर २०२१ रोजी अजंता बुद्ध विहारातील प्रांगणात पंचशील ध्वजारोहन  वस्तीतील जेष्ठ बौद्ध उपासक संतोष लहाने, हिम्मतराव म्हस्के व रत्नाकर लांडगे व ऍड. विद्यासागर दावणगावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले…यानंतर विहारात भगवान बुद्ध व महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दिपधुप पुष्प पूजा करून अजंता महिला मंडळानी  बुद्ध वंदना घेतली यावेळेस प्राचार्या वैशालीताई सरदार, पुष्पां ताई बोर्डे सह महिला मंडळ व बालक उपस्थित होते…या वेळेस  ‘आस’ शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर लांडगे यांनी मनोगत व्यक्त केले तेव्हां ते म्हणाले..

विश्वजेता सम्राट अशोका विजया दशमीचे औचित्य साधून देशात ना भुतो ना भविष्यती असे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र गतीमान करून तमाम मानवजातीला माणुस म्हणून जगण्यासाठी एक नवा आशावाद निर्माण करून दिला,शोषित,पिडीत तथा दुर्लक्षितांना बुध्दांच्या ओटीत टाकलं आणि समतेच्या मैदानात लढण्यासाठी बुध्दीचं बळ दिलं,अशा या योगा योगाने अशोका विजयादशमीच्या दिवशी आलेल्या १४ तारखेचा धर्मातरांच्या सोहळ्याच्या तथा धम्मचक्र गतीमान करण्यासाठी जाणिवपुर्वक निवडल्या गेलेल्या सम्राट अशोका विजयादशमीच्या तमाम भारतीयांना खुप खुप सदिच्छा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पाताई बोर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन सरदार मॅडम यानी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *