ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कारखानदाराना पाठीशी घालणाऱ्या मुज्जोर अधिकाऱ्याच्या विरोधात भर पावसात पँथर्स आर्मीचे आमरण उपोषण आज पासून सुरू

September 23, 202115:22 PM 8 0 0

जालना/प्रतिनिधी : प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्याला गेल्या एक ते दीड महिन्यापासून पँथर्स आर्मीच्या वतीने प्रदूषण नियंत्रण करावे यासाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी यांनी कारखान्यावर कुठलीही कारवाई केली नाही प्रदूषण मंडळ अधिकारी कारखानदारांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार होत आहे त्याकरिता आम्ही संविधानिक मार्गाने प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी जालना या कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू केले आहे.


या उपोषणाला विविध संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ कामगार भेटी देऊन गेलेत जोपर्यंत या प्रदूषित कारखान्यावर कार्यवाही होत नाही तोपर्यंत पँथर्स आर्मी हे उपोषण उठणार नाही अशी ठाम भूमिका पँथर्स आर्मी चे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर खिल्लारे यांनी घेतली आहे या उपोषणा वेळी मराठवाडा अध्यक्ष अनिल खरे मराठवाडा युवक अध्यक्ष अनिल त्रिगोटे मराठवाडा महासचिव करण जगधने जालना जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ खरात जालना जिल्ह्याचे चित्रपट आघाडी जिल्हाध्यक्ष गौतम शेळके औरंगाबाद जिल्हा कोषाध्यक्ष देवा भालेराव यांची उपस्थिती होती तसेच ग्रामीणचे संदीप संदीप सोनवणे सचिन खरात दिनेश आदमाने पवन रत्नपारखे व इतर ग्रामस्थांनी भेटी दिल्या व आम्ही तुमच्या सोबत आहे असे शब्द दिले अमचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे असे आव्हाहन केले
गोरगरिब जनता कामगार वर्ग व वन्य प्राण्यांसाठी भर पावसात पँथर्स आर्मीचे उपोषण सुरू आहे जो पर्यंत कारखान्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण उठल्या जाणार नाही जे अधिकारी कारखानदारांना पाठीशी घालतात त्यांची ही चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी असे पँथर्स आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर खिल्लारे यांनी म्हंटले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *