ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आंतरजातीय विवाह करणारे यांचा अनुदान तात्काळ द्या मुख्यमंत्रीकडे पारसनंद यादव यांची मागणी

September 6, 202115:19 PM 17 0 0

जालना । प्रतिनिधी – जालना जिल्हा परिषदचा समाजकल्याण विभागामार्फत आंतरजातीय विवाह करणारे वर-वधु यांना महाराष्ट्र शासन मार्फत अनुदान दरवर्षी देण्यात येते. विशेषतः आर्य समाज हा उपक्रम आंतरजातीय विवाह लावून विवाहाचे शासन मान्य विवाहाचे प्रमाणपत्र देण्याचे एकमेव उपक्रम राबवित आहे. संपूर्ण भारतात आर्य समाज जातीवाद नष्ट करण्याचे काम करीत आहे.

जालना जिल्हा परिषदच्या समाजकल्याण विभागात 2018 पासून लाभार्थीचे असंख्य प्रकरण प्रलंबित आहे. या योजनेचा दुर्लक्ष बाजुला ठेवून तत्कालीन समाजकल्याणमंत्री सचिन अहिर साहेब यांनी अनुदानात वाढ केली आणि 15 हजाराचे अनुदान 50 हजार पर्यंत केले. जातीवाद हटविण्यात आर्य समाजाचा सिंहाचा वाटा आहे. प्रलंबित अनुदान प्रकरण तात्काळ निकाली काढावे व महाराष्ट्रातील जालना जिल्हा परिषदसह सर्वांना आंतरजातीय विवाहाचे अनुदान तात्काळ देण्यात यावे असे निवेदन मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना जालना आर्य समाजाचे अध्यक्ष पारसनंद यादव, पुरोहित – लग्न लावणारे संतोष आर्य महापंडीत, उपाध्यक्ष विजयभाऊ खताडे व सचिव राजेश कांबळे तसेच सहसचिव सय्यद महेमूद यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *