ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

माता-पिता हेच कुटुंबाचे मार्गदर्शक

October 23, 202115:06 PM 68 0 0

वृद्धांचा मुलाकडून किंवा सुनेकडून छळ चालू असलेल्या बातम्या वाचावयास मिळतात.सर्वच घटना प्रसार माध्यमा पर्यंत पोहचत नाहीत.काही सुना वृद्ध सासू सास-यास इतक्या चांगल्या संभाळतात की,त्या दोघांच्या तोंडातून सुने विषयी कधीही ब्र शब्द निघत नाही.कारण त्या सासू आपल्या सुनेला स्वतःचीच मुलगी समजून तिच्याशी वागत असतात पण काही आपल्या सुनेला सारखी काट्यावर धरत असेल आणि तिच्या प्रत्येक कामात चुका काढत असेल तर ती सून चिडत असते.या ठिकाणी सून म्हणजे सूचना नको आणि सासू म्हणजे सारख्या सूचना अशी शब्दाची फोड केली तर विनोदी वाटणारी व्याख्या सत्य सांगून जात असते.
सुनेच्या मनामध्ये सासू विषयी त्यामुळे तिरस्काराची भावना निर्माण होत असते.पुढे पुढे त्यामुळे सून सासुचे ऐकत नाही.त्यामुळे सासू सुनेचे भांडण सुरू होते.कधी कधी काही घरात सासू तिच्या भूतकाळातील केलेल्या कामाचे कौतुक करत असतात.अलीकडील परिस्थिती नुसार किंवा काळानुसार सुनेला लागू पडत नाही.असे घडू नये यासाठीच सासुनी आपल्या सुनेला स्वतःचीच मुलगी समजून वागल्यास त्या कुटुंबात कलह निर्माण होणार नाहीत.मुलाला हे सर्व भांडण किंवा वादविवाद चालू असलेले माहिती असले तरी नक्की कोणाची बाजू घ्यावी हेच कळत नाही.हे सर्व मुलगा डोळ्यावर कापड ओढूनच कुटुंबात वागत असतो.अगदीच नाविलाज झाल्यास मग स्वतंत्र राहण्याचा पर्याय निर्माण होत असतो.ते टाळण्यासाठी सासुने मलाच कळते या घरात माझे शिवाय कोणालाच कळत नाही अशी स्वतःच्या मनाची स्वतः विषयी केलेली गैरसमजूत बदलली पाहिजे.ती बदलली नाहीतर मग कुटुंबात कलह झाल्या शिवाय राहणार नाहीत.
सासूने आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे.कारण शस्त्राने केलेली शरीरा वरील जखम बरी होते पण शब्दाने केलेली मनावरील जखम कधीच बरी होत नाही.कारण शब्द हे एक प्रकारचे शस्त्र आहे.आपण त्याचा विसर पडू देता कामा नये.वृद्धांनी त्या कुटूंबातील मार्गदर्शक व्हावे.आपल्या आलेल्या गोड कडू अनुभवाचा लाभ त्या कुटुंबास मार्गदर्शक चांगले असतात अशीच आपली भूमिका राहिली पाहिजे.ज्या कुटूंबात मार्गदर्शक चांगले असतात त्या कुटुंबात कधीहि भांडणे होत नसतात.कारण शेवटी सून म्हणजे आपल्या मुलाची पत्नी असते आपल्याला मुलगा असल्या मुळेच आपल्या घरात परक्याची मुलगी सून म्हणून येत असते.पण काळाच्या ओघात किंवा भावनेच्या रागाच्या भरात आपण आपण विसरून जातो.आपल्याला मुलगाच नसता तर परक्याची मुलगी आपल्या घरात सून म्हणून आलीच नसती.म्हणूनच आपण एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू समजावून घेऊन वागले पाहिजे.सारखी एकच बाजू वाईट आहे असे म्हणणे चूक आहे.


वृद्धांनी सुद्धा आपले आता किती दिवस राहिलेले असतात त्यासाठी ” मौंनम सवार्थ साधनम” या उक्तीप्रमाणे राहिले पाहिजे.त्याशिवाय सासू-सून हे विळ्या- भोपळ्याचे नाते संपुष्टात येणार नाही. सर्व कुटुंबात भगवान गौतम बुध्दांनी सांगितल्या प्रमाणे मध्यम मार्गाचा अवलंब करावा.कोणीही टोकाची भूमिका घेऊ नये.कोणी एक विस्तव झाले असेल तर दुसऱ्याने पाणी होण्याची आजच्या काळात गरज आहे.अन्यथा ” राग आणि भीक माग ” या म्हणी प्रमाणे कुटूंबात कलह होऊन संसार धुळीला मिळेल त्यासाठी सासूने आपल्या सुने विषयी व सुनेने आपल्या सासू विषयी शेजारी- पाजारी आपल्या आसपास प्रचार किंवा प्रसार करू नये.कारण शेवटी शेजारी-पाजारी हे आपली गंमत पहात असतात. आमच्या घरात भांडणे नसतात पण शेजारच्या घरात सारखी असतात . आपल्या कुटुंबाची निंदा करीत असतात हे आपणास कळत नाही. त्यासाठी आपण सुद्धा सुधारणेचा प्रयत्न केला पाहिजे.” निंदकाचे घर असावे शेजारी ” असेही आपल्या ऐकिवात असेल त्यासाठी कोणती न पटणारी बाब किंवा गोष्ट सासू अगर सून त्यांच्यात असेल ते एकमेकींनी एकमेकीला समजावू घेऊनच त्यावर सखोल विचार करून शांततेच्या मार्गानेच चालले पाहिजे.तर आणि तरच आपल्या घरात सुख शांती लाभेल. ज्या कुटुंबात शांतता असेल त्या कुटुंबात आपणास खाली नमूद केलेले पूर्वी एकदा ऐकलेले गीत ऐकण्याची संधी मिळेल.
“देवा मजला माय-पित्याची सेवा करू ध्या पुरी विठ्ठला थांब जरा तोवरी त्रिभुवन हे दैवत माझे वृद्ध पिता अन माई
काशी मथुरा गोकुळ सारे
तीर्थ तयाचे ठायी
माता-पित्यांच्या चाकराला
उरकू ध्या चाकरी
विठ्ठला थांब जर तोवरी
प्रथिलयाविन कसे अचानक
इकडे येणे झाले
प्रश्न करुनि भगवंताला
पुंडलीक तो बोले
तुमच्यासाठी वीट फेकतो
रहा तुम्ही तिजवरी
विठ्ठला थांब जरा तोवरी
पिता हा माझा पांडुरंग
अन माता रखुमाई
तीर्थ नाही दुसरे माझे
दैवत दुसरे नाही
इथंच माझी चंद्रभागा
आणि इथंच पंढरी
देवा मजला माता पित्यांची
सेवा करू द्या पुरी
विठ्ठला थांब जरा तोवरी ”
वरील गीत घराघरा मधून ऐकावयास यायचे असेल तर वृद्ध माता-पित्यांनी आपण केवळ आपल्या मुलांचे माता पित्यांनी आपण केवळ आपल्या मुलांचे माता-पिता न होता आपल्या सुनेचे माता पिता झाले पाहिजे.म्हणजेच वागणूक व आपला स्वभाव बदलला पाहिजे.आपण केवळ वृद्ध “माता-पिता हेच कुटुंबाचे मार्गदाते “म्हणूनच भूमिका बजावली पाहिजे.
लेखक
जी.एस.कुचेकर पाटील
भुईंज तालुका वाई जिल्हा सातारा
मो.न.७५८८५६०७६१

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *