ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पालकांनी आपल्या मुलांवर योग्य संस्कार केले पाहिजेत! भदंत पंय्याबोधी थेरो यांचे प्रतिपादन

January 11, 202112:55 PM 120 0 0

नांदेड – जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलांवर सुयोग्य संस्कार होणे आवश्यक असते. संतती चांगली निपजली तर धनसंपत्ती टिकून राहील. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांवर योग्य संस्कार केले पाहिजेत. ही पालकांचीच जबाबदारी आहे. धनसंपत्ती पेक्षा संतती श्रेष्ठ असते असे प्रतिपादन येथील धम्म चळवळीचे प्रसारक तथा खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले. ते गायतोंड मनाठा येथे घेण्यात आलेल्या पाचव्या बौद्ध धम्म परिषदेचा समारोप करताना बोलत होते. यावेळी धम्मपीठावर भंते काश्यप, भंते चंद्रमणी, भंते श्रद्धानंद, भंते सुदर्शन, भंते शिलभद्र, भंते अश्वजित, धम्मसंदेश व धम्मदान यात्रा संकल्पक गंगाधर ढवळे, माजी श्रामणेर निवृत्ती लोणे, चंद्रकांत परघणे आदींची उपस्थिती होती.

 

तालुक्यातील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथून धम्मसंदेश व धम्मदान यात्रा हदगाव तालुक्यातील मौजे गायतोंड मनाठा परिसरातील मृगदायिनी वनात संपन्न होत असलेल्या पाचव्या बौद्ध धम्म परिषदेत पोहोंचली. सकाळी परित्राणपाठ, बुद्ध धम्म संघ वंदनेचा कार्यक्रम झाल्यानंतर भिक्खु संघ काश्यप यांच्या हस्ते एकदिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे ध्वजारोहण करुन उद्घाटन करण्यात आले. धम्मपरिषदेच्या समारोप प्रसंगी बोलताना पंय्याबोधी म्हणाले की, बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी भिक्कु संघाच्या निर्मितीची आवश्यकता आहे. श्रीलंकेत प्रत्येक घरातून एक मूल भिक्षू संघाला दान करण्याची परंपरा आहे.‌ धम्मचळवळीकरिता आर्थिक दानाबरोबरच संतती दानालाही महत्व आहे. याबाबत पालकांची मानसिकता बदलण्यासाठी तृष्णा आणि मोह मायेच्या जंजाळातून मुक्त होऊन धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असेही ते म्हणाले.

परिषदेच्या शेवटच्या सत्रात भंते सुदर्शन व भंते श्रद्धानंद यांच्याही धम्मदेसना संपन्न झाल्या तसेच गंगाधर ढवळे, चंद्रकांत परघणे, निवृत्ती लोणे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रमेश खिल्लारे यांनी केले तर आभार धम्म परिषद संयोजन समितीचे अध्यक्ष राजू वाठोरे यांनी मानले. पाचव्या बौद्ध धम्म परिषदेच्या यशस्वी संयोजनासाठी समता सैनिक दलाच्या गोदावरी नरवाडे, संगिता सोनाळे, विजयमाला सोनाळे, भारतबाई सोनाळे, संयोजन समितीचे संजय सोनाळे, अर्जून सोनाळे, अमोल सोनाळे, सुजाता वाठोरे, लक्ष्मी सोनाळे, चतुरा सोनाळे, उज्वला दांडगे, शांताबाई वाठोरे, प्रयाग वाठोरे, शांता सोनाळे, प्रकाश सोनाळे, धम्मज्योती सोनाळे, विलास सोनाळे, अशोक सोनाळे, अॅड. भीमराव सोनाळे, देवराव थोरात आदींनी परिश्रम घेतले. धम्मदान आणि भोजनदानानंतर धम्मपरिषदेची सांगता झाली. यावेळी गायतोंड, मनाठा परिसरातील बौद्ध उपासक, उपासिका, बालक, बालिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती उपस्थिती होती.

 

‘त्या दहा नवजात शिशूंना वाहिली श्रद्धांजली…’

दरम्यान, भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला. या अत्यंत हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेप्रती करुणाभाव, संवेदना व्यक्त करण्यासाठी गायतोंड येथे भरलेल्या पाचव्या बौद्ध धम्म परिषदेत दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भिक्कु संघानेही आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. या सत्राचे संचालन गंगाधर ढवळे यांनी केले. यावेळी सृष्टीतील तमाम मानव प्राणीमात्रांबद्दल मैत्री भावना संदेश उपस्थित बौद्ध उपासक उपासिका यांना देण्यात आला. यावेळी धम्म परिषद संयोजन समितीने तत्परता दाखवत सहकार्य केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *