ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

घरोघरी तिरंगा अभियानात सहभागी व्हा ; उरण पोस्ट ऑफिस चे नागरिकांना आवाहन

August 12, 202214:40 PM 12 0 0

उरण ( संगिता पवार ) : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याची स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक / क्रांतिकारक, स्वातंत्र्यसंग्रामात पडलेल्या विविध घटना यांचे संस्मरण व्हावे व देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमाणसात राहावे या उद्देशाने या दैदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने उरण १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा झेंडा घरो -घरी लावावा असे आवाहन करण्यात येत आहे.

नागरिकाच्या घरावर तसेच सर्व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक शासकीय, निमशासकीय, खाजगी सूचनेनुसार घरोघरी तिरंगा कार्यक्रम आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फुर्तीने करणे अपेक्षित असल्याचे पोस्ट ऑफिस मधून सांगण्यात येत आहे. यावेळी प्रत्येक नागरिकांनी संहितेचे पालन करावे… तिरंगा फडकविताना केशरी रंग/ वरच्या बाजूने असावा, तिरंगा झेंडा उत्तरवताना काळजीपूर्वक सन्मानानेउतरावा .

६ ऑगस्टपासून पोस्ट ऑफिस येथे सर्व नागरिकांनी २५ रक्कम रुपये मात्र भरून झेंडा खरेदी करावा, असे आवाहन उरण पोस्ट ऑफिस चे पोस्टमास्तर प्रशांत म्हात्रे यानी केले आहे. घरोघरी तिरंगा उपक्रमात १३ ते १५ ऑगस्ट हे तीन दिवस तिरंगा फडकविताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरवण्याची आवश्यकता नाही,
घरोघरी तिरंगा झेंडा उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले झंडे अभियान कालावधीनंतर प्रत्येकाने सन्मानाने व सुरक्षित ठेवावे, अभियान कालावधीनंतर झेंडा फेकला जाऊ नये, तो सन्मानाने जतन करून ठेवावा, अर्घा झुकलेला, फाटलेला, कापलेला हा कुठल्याही परिस्थितीत लावला जाऊ नये. आशा सूचना उरण पोस्ट ऑफिस च्या वतीने देण्यांत आल्या आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *