ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

परभणीतील राज्यव्यापी लिंगायत महामोर्चात सहभागी व्हा : राजेंद्र वांजुळे

October 22, 202114:57 PM 10 0 0

जालना ( प्रतिनिधी) : लिंगायत धर्मास संविधानिक मान्यता मिळावी, लिंगायत धर्मियांना धार्मिक अल्पसंख्यांकांचा दर्जा जाहीर करावा, बेरोजगार तरुणांसाठी म. बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. मंगळ वेढा येथील राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे , राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांच्या मृत्यू ची सीबीआय चौकशी करावी. अशा महत्त्व पूर्ण मागण्यांसाठी रविवारी ( ता. 24) परभणी येथे राज्यव्यापी लिंगायत महामोर्चा आयोजित करण्यात आला असून लिंगायत बांधवांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे. असे आवाहन लिंगायत धर्म आंदोलनाचे नेते राजेंद्र वांजुळे यांनी केले आहे. महामोर्चा च्या पार्श्वभूमीवर गुरुवारी ( ता. 21) नियोजना बाबत राजेंद्र वांजुळे यांनी माहिती दिली. या वेळी लिंगायत समन्वयक मा. नगरसेवक अॅड. रोहित बनवसकर, मल्लिकार्जुन मानूरकर, बबलू सातपुते ,मोहन मिटकरी, अतीश घाडगे, गजानन आप्पा मेणे, गजानन आप्पा वाजगे, अजय ढेप्पे ,रेवन कौसडीकर, संतोष नामदे, तोडकर यांची उपस्थिती होती.

राजेंद्र वांजुळे पुढे म्हणाले, लिंगायत धर्माला स्वतंत्र, स्वाभिमानी, मानवतावादी इतिहास आहे . मात्र याची माहिती लिंगायत बांधवांना नसल्याने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतरही संवैधानिक हक्क, अधिकारांपासून लिंगायत बांधव वंचित राहिले असून यामुळे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय लाभ मिळत नसल्याचे राजेंद्र वांजुळे यांनी नमूद केले. स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी लिंगायत, शिख व जैन या धर्मांचे हिंदू धर्मात समावेश केले. शिख व जैन बांधवांनी त्यांच्या स्वंतत्र मान्यता पुन्हा मिळवल्या. असे सांगून राजेंद्र वांजुळे म्हणाले, 1951 पासून भारताच्या लोकसंख्येत सहा टक्के संख्या असलेला लिंगायत धर्म आजही पारतंत्र्यात असल्याने अन्य धर्मांचा द्वेष न करता लिंगायत बांधवांची शैक्षणिक,व्यवसायिक, औद्योगिक,आर्थिक, धार्मिक, राजकीय, प्रगती व्हावी. यासाठी स्वतंत्र धार्मिक व अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याकरिता परभणी येथे राज्य व्यापी महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. अशी भूमिका राजेंद्र वांजुळे यांनी स्पष्ट केली.
रविवारी ( ता. 24) दुपारी 12.00 वा. शनिवार बाजार येथून महामोर्चास प्रारंभ होईल. प्रमुख मार्गांवरून जात जिल्हाधिकारी कार्यालया समोर महामोर्चा विसर्जित केला जाणार असून लिंगायत बांधवांनी मोठ्या संख्येने महा मोर्चात सहभाग नोंदवावा .असे आवाहन राजेंद्र वांजुळे यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *