ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पाशा पटेल यांची बांबू लागवड चळवळ शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलणारी- ना. राजेश टोपे

January 26, 202212:59 PM 45 0 0

जालना (प्रतिनिधी)   – पर्यावरण अभ्यासक पाशा पटेल यांच्या बांबू लागवड चळवळीमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलणार आहे. त्यामुळे या चळवळीला आपले सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मंगळवारी (ता. 24) घनसांगी तालुक्यातील टेंभी अंतरवाली येथे बोलताना दिली. टेंभी अंतरवाली येथे ग्रामपंचायतच्यावतीने पर्यावरण अभ्यासक तथा बांबू लागवड चळवळीचे प्रणेते पाशा पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आज ‘नदी झांकी तो जल राखी’ या संकल्पनेअंतर्गत ‘नरुळा नदी पुनर्जीवन व बांबू लागवड ते प्रक्रिया उद्योग’ या विषयावर शेतकरी व कृषीप्रेमी मान्यवरांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ना. राजेश टोपे बोलत होते. व्यासपीठावर मार्गदर्शक पाशा पटेल, त्यांचे सहकारी संजय करपे, जिल्हा परिषद सदस्य रघुनाथ तोर, सभापती सौ. मंजूषा महेश कोल्हे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. एस. रणदिवे, तालुका कृषी अधिकारी श्री. रोडगे, सरपंच मालनबाई जवकर, डॉ. सुयोग कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी ना. टोपे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी आता आधुनिक शेतीकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे. बांबू शेती ही मोठी फायदेशीर ठरणारी असून, आपण याबाबतची आणि बांबूपासून इथेनॉल निर्मितीची माहिती पाशा पटेल यांच्याकडून जाणून घेतली आहे. परळी औष्णिक ऊर्जा प्रकल्पात दगडी कोळसा ऐवजी बांबूचा वापर करण्याच्या सूचना सरकारने यापूर्वीच दिल्या आहेत. बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाची संकल्पना अतिशय उपयुक्त आहे. बॉयलरमध्ये दगडी कोळसाऐवजी बांबू वापर पर्यावरणदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरत आहे. आगामी काळात बांबूची मोठी बाजारपेठ निर्माण होत असून, शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणाऱ्या बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रेरित करण्याचे आदेश त्यांनी यावेळी उपस्थित जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले. शासनाच्या अनेक कृषीविषयक योजनेअंतर्गत बांबू लागवड करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी मार्गदर्शन करताना पाशा पटेल म्हणाले की, आपण गेल्या वर्षभरापासून पर्यावरणपूरक बांबू लागवडीसाठी जनजागृती करत असून, या चळवळीसोबतच गोदा नदी पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. बांबू लागवड हे बिनखर्चिक पिक आहे. नदीकाठी बांबू लागवड केल्यास सावली निर्माण होऊन बाष्पीभवन होणार नाही आणि त्यामुळे पाणीसाठा कायम राहील. शिवाय नदीकाठची मातीही वाहून जाणार नाही. सन 1927 मध्ये इंग्रजांनी बांबूला वृक्ष संवर्गात टाकले होते. त्यामुळे बांबूची कापणी आणि वाहतुकीसाठी परवानगी घ्यावी लागायची. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांबूचा समावेश गवत वर्गात केल्यामुळे शेतकऱ्यांच्या बांबू कापणी आणि वाहतुकीला परवानगीची गरज नाही आज-काल बांबूची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ तयार होणार आहे. बांबू शेतीमुळे शेतकऱ्यांना निश्चितच आर्थिक सुबत्ता प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी बांबूपासून निर्माण होणाऱ्या वस्तूंची माहिती देत बांबू पर्यावरणासाठी किती महत्त्वपूर्ण आहे, याची महती विशद केली. या कार्यशाळेला बाजार समितीचे सभापती तात्यासाहेब उढाण, तात्यासाहेब चिमणे, रमेश धांडगे, भारत मंत्री, भागवत सोळुंके, रवी आर्दड, श्यामसुंदर मुकणे, राजू कोल्हे आदींसह परिसरातील शेतकरी आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी महेश कोल्हे, सरपंच मालनबाई जवकर, चेअरमन धनंजय कोल्हे, संदीप शर्मा आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

ना. टोपेंनी विश्वास सार्थ ठरविला
पाशा पटेल म्हणाले की, माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राजेश टोपे यांची आरोग्यमंत्रीपदी नेमणूक करून कोरोनाला पळवून लावण्यासाठीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत ना. टोपे यांनी शरद पवारांचा विश्वास सार्थ ठरविला, असे गौरवोद्गार यावेळी पाशा पटेल यांनी काढले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *