जालना ( प्रतिनिधी): वैयक्तिक भावना बाजूला ठेवून, लोकहिताची जबरदस्त जाणीव, प्रेम, दया, सहानुभूती यांचा संगम असलेल्या परिचारिका मानवजातीच्या सेवेचं वृत्त घेऊन कार्यरत आहेत.स्वतः चा जीव धोक्यात घालून रुग्णांसाठी केलेले पुण्यवंत कार्य खचलेल्यांसाठी जीवनदायी आहे. असे गौरवोद्गार लॉयन्स क्लबचे उपप्रांतपाल लॉ. पुरुषोत्तम जयपुरिया यांनी आज येथे बोलताना काढले.
प्रथम परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिन अर्थात अंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधून जालना लॉयन्स क्लब परिवारा तर्फे बुधवारी ( ता. १२) विवेकानंद हॉस्पिटल येथे कोरोना योध्दा असलेल्या बेचाळीस ( ४२) परिचारिकांचा रोगप्रतिकारक शक्ती युक्त मिठाई व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. .यावेळी माजी प्रांतपाल लॉ. विजय बगडिया , लॉ.श्याम लोया, लॉ.सुभाष देवीदान, लॉ.रामकुॅवर अग्रवाल, लॉ. अरूण मित्तल, लॉ.सतीश संचेती , लॉ.विनोद कुमावत, लॉ. डुगंरसिंह राजपुरोहित,लॉ.विनोद पवार ,लॉ.द्वारकादास मुंदडा ,लॉ.डॉ. गिरीश पाकणीकर ,लॉ.डॉ. श्रीमंत मिसाळ ,डॉ.कायंदे ,
वाघमारे ,राजेश फटाले यांची उपस्थिती होती.
लॉ. जयपुरिया म्हणाले, आम्हाला आरोग्य विषयक उपक्रम घेताना परिचारिकांचे मोलाचे सहकार्य वेळोवेळी लाभते. समाजाचा महत्वपूर्ण घटक असलेल्या परिचारिका यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे याच भावनेतून आमचा अल्पसा प्रयत्न आहे
लॉ. डॉ. श्रीमंत मिसाळ म्हणाले की, येथील परिचारिका गेल्या वर्षभरापासून प्रचंड मेहनत घेत असून अनेक कोवीड ग्रस्त रुग्णांना त्यांच्या अथक परिश्रमांमुळे सुखरूप घरी जाता आले. असे डॉ मिसाळ यांनी सांगितले.
लॉ. डुंगरसिंह राजपुरोहित यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेत वाहून घेतलेल्या परिचारिकांना त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी व सेवेस बळकटी मिळावी याकरिता सुकामेवा, सुंठ आदी रोगप्रतिकारक शक्ती असलेली मिठाई विशेष तयार करण्यात आली. असून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमचा हा प्रयत्न असल्याचे डूंगरसिंह राजपुरोहित यांनी नमूद केले.
लॉ. सुभाष देवीदान, लॉ. विजय बगडिया यांनी परिचारिकांना कार्यास शुभेच्छा दिल्या.
सुञसंचालन लॉ. सतीश संचेती यांनी केले तर लॉ अरूण मित्तल यांनी आभार मानले. या वेळी सेवेत असलेल्या बेचाळीस परिचारिकांचा गौरव करण्यात आला.
Leave a Reply