ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आर्थिक लाभासमोर बीसीसीआयला शून्य वाटणारे राष्ट्रप्रेम

October 24, 202113:02 PM 71 0 0

भारतातील राष्ट्रप्रेमींनी टी-२०’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यात २४ ऑक्टोबरला होणारा क्रिकेट सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत आतंकवाद्यांमुळे कित्येक भारतीय सैनिक हुतात्मे झाल्यावर देखील त्यांच्याशी क्रिकेटचे सामने का म्हणून खेळायचे ? असा प्रश्न येथे उपस्थित करावासा वाटतो.

क्रिकेट सामन्यांद्वारे खोर्‍याने पैसे ओढणार्‍या भारतीय बीसीसीआयला हे न कळणे एवढे ते अजाण आहे का ? क्रिकेटचे सामने हे ‘नियोजित’च असतात; मात्र नियमांपेक्षा राष्ट्रीय अस्मिता महत्त्वाची नाही का ? सैनिकांनी अशा भारतीयांसाठी सीमेवर शहीद व्हायचं का ? तुमचे देशाप्रती असणारे कर्तव्य कधी बजावणार ? या सर्व प्रश्नांचे उत्तर बीसीसीआयने भारतीय जनतेला द्यावी असे वाटतेय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाला बीसीसीआय मोठ्या प्रमाणात निधी पुरवते. बीसीसीआयने मनात आणले, तर तो पाकशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेऊ शकतो; मात्र आर्थिक लाभाच्या मोहापायी बीसीसीआय असा निर्णय घेण्यास टाळत आहे हे राष्ट्रप्रेमी जनतेला मान्य होईल का ?

डॉ. भारती अनिल हेडाऊ, यवतमाळ

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *