ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

युट्युब, फेसबुक, पोर्टल या व यासारख्या सोशल मिडीयच्या स्वयंघोषित संपादक व पत्रकारांवर अंकूश लावण्यासह त्यांच्यावर कारवाई करण्याची पीसीएमची मागणी

December 1, 202116:16 PM 49 0 0

जालना । प्रतिनिधी – जिल्ह्यात युट्युब, फेसबुक, पोर्टल या व यासारख्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बातम्या प्रसारित करण्यात येत आहेत. यात स्वतःला स्वयंघोषित संपादक व पत्रकार म्हणवून घेतात. अशा संपादक व पत्रकारांवर अंकूश लावून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जालना जिल्ह्यात युट्युब, फेसबुक, पोर्टल या व यासारख्या सोशल मिडीयाच्या माधमातून बातम्या मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात येत आहे. यात स्वतःला स्वयंघोषित संपादक व पत्रकार म्हणवून घेतात. वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रानिक माध्यमांना शासनाच्या आरएनआय (रेजिस्ट्रेशन न्यूज पेपर ऑफ इंडिया) व एमआयबी (सूचना एवं प्रसारण मंत्रालय) यांच्याकडून नोंदणी करणे आवश्यक असते. तसेच त्यांना प्रेस कॉन्सील ऑफ इंडिया आणि केबल नेटवर्क अ‍ॅक्टच्या सूचनांचे पालन करावे लागते.

मात्र, युट्युब, फेसबुक, पोर्टल या व यासारख्या सोशल मिडीयास असे बंधन नव्हते. मात्र, माहिती व सुचना प्रसारण मंत्रालयाने 25 फेब्रुवारी 2021 रोजी अधिसूचना काढली. या अधिसूचनेनूसार ऑनलाईन न्यूज, ओटीटी प्लॅटफॉर्म व डिजिटल माध्यमांसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने प्रकाशकांकडून स्व-नियमन, प्रकाशकांच्या स्व-नियंत्रित संस्थांद्वारे स्व-नियमन आणि देखरेख यंत्रणा ही तीन स्तरीय तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे.
वेब पोर्टल, युट्युब आदी सोशल मिडीयातील घटकास स्व-नियमन तसेच त्यास एखाद्या स्वनियंत्रित (स्व-नियमन) संस्थेचा सदस्य असणे गरजेचे आहे. असे असतांना जालना जिल्ह्यात माहिती व सुचना प्रसारण मंत्रालयाच्या अधिसूचनेचे पालन न करणारी अनेक युट्युब, फेसबुक, पोर्टल या व यासारख्या सोशल माध्यम कार्यरत आहेत. विशेष म्हणजे त्यांना संपादक अथवा पत्रकार म्हणून वावरण्याचा कोणताही उल्लेख महिती व सुचना प्रसारण मंत्रालयाच्या अधिसूचनेत दिसून येत नाही. माहिती व सुचना मंत्रालयाच्या अधिसूचनेनंतर एनबीएफ, डब्ल्यूजेएसए, आयडीपीसीजीसी या तीन संस्थांना स्व-नियमन संस्था म्हणून मान्यता दिली आहे. या संस्थेची यादी ही माहिती व सुचना मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवरही उपलब्ध आहे.
माहिती सूचना मंत्रालयाने दि 25 फेब्रुवारी 2021 रोजी काढलेली अधिसूचना तसेच या मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्व-नियमन संस्थेची यादी त्यांच्या सदस्यांसह निवेदनासह देण्यात आली असून नियमांत न बसणार्‍या युट्युब, फेसबूक, पोर्टल या व यासारख्या सोशल मिडीयाद्वारे प्रसारित करण्यात येणार्‍या बातम्यांच्या माध्यमातून स्वयंघोषित संपादक व पत्रकार म्हणवून घेणार्‍यांवर अंकूश लावण्यात यावा व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी पीसीएमच्यावतीने करण्यात आली आहे. निवेदनावर पीसीएमचे जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके, सरचिटणीस महेश जोशी, उपाध्यक्ष गणेश काबरा, कोषाध्यक्ष शेख इलियास अब्बास, सहसचिव गोपाल त्रिवेदी, सय्यद नदीम, शांतीलाल बन्सवाल आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *