ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पीसीएम जालन्यातील सभासदांना मिळणार सवलतीच्या दरात औषधोपचार विवेकानंद हॉस्पीटल आणि इंजे मेडीकलच्या संचालकांचा सत्कार

January 9, 202213:52 PM 45 0 0

जालना । प्रतिनिधी – प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र (पीसीएम) जालना जिल्ह्यातील सभासदांना सवलतीच्या दरात औषधोपचार मिळणार आहे. पीसीएमच्या विनंतीवर विवेकानंद हॉस्पीटल व इंजे मेडीकल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हॉस्पीटल प्रशासन आणि मेडीकल संचालकांनी सवलतीच्या बाबतीतले पत्र संघटनेला दिले असून याचा लाभ सभासदांनी घ्यावा असे आवाहन जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके व राज्य सरचिटणीस विजयकुमार सकलेचा यांनी केले आहे. हॉस्पीटल आणि मेडीकलच्या या निर्णयाबद्दल हॉस्पीटल प्रशासनाचे व मेडीकल संचालकांचे सत्कार करून पीसीएमच्यावतीने आभार व्यक्त केले आहे.

पत्रकारांच्या आरोग्याचा विचार पत्रकारांच्या प्रत्येक संघटनांच करतातच, त्यातल्या त्यात एखाद्या पत्रकारास औषधोपचाराची गरज भासल्यास निधी संकलनही मोठ्या प्रमाणात करण्यात येते, याचा विचार करता पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हॉस्पीटल आणि मेडीकलच्या माध्यमातून त्यांना मदत व्हावी या उद्देशाने प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्यावतीने विवेकानंद हॉस्पीटल प्रशासनाला व इंजे मेडीकल संचालकास पत्र देऊन पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आपल्या स्तरावर काही सुट किंवा मदत करता येते का याबाबत निवेदन देऊन चर्चा केली होती. याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून विवेकानंद हॉस्पीटल आणि इंजे मेडीकलने प्रेस कॉन्सीलला पत्र दिले आहे.
विवेकानंद हॉस्पीटल प्रशासनाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, संघटनेचे सदस्य व त्यांच्या कुटुंबियांचे उपचार राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनेअंतर्गत जसे की, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना विवेकानंद हॉस्पीटलमध्ये मोफत करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला जाईल. तसेेच जे आजार योजनेत सामाविष्ट होणार नाहीत. त्या आजारांवरील उपचार व शस्त्रक्रिया यामध्ये 20 टक्के सवलत देण्यात येईल. तसेच आंतर व बाह्य रुग्णांना कराव्या लागणार्‍या विविध तपासण्यांमध्ये 20 टक्के सवलत देण्यात येईल. ही सवलत संघटनेच्या पत्रकार सदस्य व त्यांच्यावर अवलंबुन कुटुंबियांतील चार सदस्यांना देण्यात येणार ही सवलत 1 जानेवारी 2022 पासून सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. सदस्यांनी उपचारासाठी येतांना ओळखपत्र व योजनेअंतर्गत समावेश करण्यासाठी मुळ आधार कार्ड व रेशनकाडे आणणे आवश्यक असल्याचेही विवेकानंद हॉस्पीलट प्रशासनाच्यावतीने एम.डी. डॉ. चारुदत्त हवालदार व सीएओ डॉ. गिरीष पाकणीकर यांनी कळविले आहे. विवेकानंद हॉस्पीलच्या सहकार्याबद्दल पीसीएमच्यावतीने व्यवस्थापकीय संचालक डॉ. चारुदत्त हवालदार, डॉ. सौ. माधुरी पाकणीकर, डॉ. सौ. चारुस्मिता हवालदार, डॉ. सतिश गोयल, डॉ. राजकुमार सचदेव, डॉ. श्रीमंत मिसाळ, डॉ, रोहीत कासट, डॉ. अनिल कायंदे, डॉ. गिरीष पाकणीकर यांचा सत्कार राज्य सरचिटणीस विजयकुमार सकलेचा व जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी केला.
इंजे मेडीकलच्यावतीने संचालक आनंद इंजे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, संघटनेचे पत्रकार सदस्य व त्यांच्या कुटुंबियांसाठी औषधींमध्ये जास्तीत जास्त सवलत देण्याचा प्रयत्न केला जाईल. यात प्रामुख्याने औषधी व त्यांच्या ब्रॅण्ड वर ही सवलत कमी-अधिक प्रमाणात जवळपास 5 टक्के ते 30 टक्क्यांपर्यंत देण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. यासहकार्याबद्दल दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मेडीकलचे संचालक आनंद इंजे यांचा उद्योजक संजय खोतकर, युवा नेते अक्षय गोरंट्याल यांनी सत्कार केला. यावेळी उद्योजक अरुण अग्रवाल, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंडगे, जिल्हारत्न ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, कवियित्री संजिवणी तडेगावंकर, देवगिरी प्रतिष्ठाणचे बबन सोरटी, पीसीएमचे राज्य अध्यक्ष इलियास खान, राज्य सरचिटणीस विजयकुमार सकलेचा, जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *