ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण येथे शांतता कमिटी बैठक संपन्न

May 2, 202215:11 PM 42 0 0

उरण (संगीता पवार ) : उरण शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यात यावी या साठी उरण पोलीस ठाण्यात नवी मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त ( पोर्ट विभाग) धनाजी शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत यंकाळी ६.३० ते ८ .१५ या दरम्यान उरण पोलीस ठाणे हददीतील शांतता कमिटी सदस्यांची बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीमध्ये सुरु असलेल्या घडामोडीच्या बाबतीत चर्चा करण्यात आली. सर्व जातीचे, धर्माचे लोकांनी एकत्र, गुण्यागोविंदाणे राहावे आप आपसात कोणताही वादविवाद करू नये, अश्या सूचना देण्यात आल्या. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणेबाबत सूचना दिल्या.
सर्व नागरिकांनी पोलीस ठाण्यास सहकार्य करावे पोलीस आपले मित्र आहेत पोलीस हि आपल्यांना सहकार्य करतील अश्या प्रकारे मार्गदर्शन सहाय्यक पोलीस आयुक्त ( पोर्ट विभाग )धनाजी शिरसागर यांनी उपस्थितीत असलेल्या सदस्यांना मार्गदर्शनात सांगितले .
या वेळी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील ,मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठपोलीस निरीक्षक अभिजित मोहिते, न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे पोलीस अधिकारी ,कर्मचारी ,व ४० शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *