ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जनतेच्या मदतीसाठी पुढे यावे – शेख माजेद

April 27, 202119:29 PM 7 0 1

जालना (प्रतिनिधी) ः कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. जनता सैरावैरा मदतीसाठी धावत आहे. उपाशीपोटी अनेकांची कुटंब झोपत आहेत. जनतेला लोकपतिनिधींच्या मदतीची खरी गजर असतांना देखील लोकप्रतिनिधी कोणत्या बिळात जाऊन बसलेत कळायला मार्ग नाही. बिकट परिस्थितीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जनतेच्या मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन एआयएमआयएम चे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी केले आहे.

जालना जिल्ह्यात कोरोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. शिवाय रोजच बळी जाण्याची संख्या दिवसेंदिव वाढत आहे. मृत्युदर कमी करण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरत आहे. त्यात लोकप्रतिनिधी मदत करायचे सोडून बिळात जाऊन बसले आहेत. त्यामुळे जनता वार्‍यावर सोडली गेली आहे. लोकांना वेळेवर मदत मिळत नाही, त्यांना उपचार मिळत नाहीत. गोरगरीब रुग्णा मरणाच्या दारात सोडून दिले जात आहेत. ही परिस्थितीती अत्यंत भयंकर असून जनतेला मदतीची नितांत गरज आहे. शिवाय जनतेला मदत करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच आहे. औरंगाबाद चे खासदार इम्तीयाज जलील यांनी यांनी औरंगाबाद घाटी हॉस्पिटलला 5 व्हेंटीलिटर दिले आहेत.तसेच खासदार निधितुन करोड़ो रुपये आपल्या जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यासाठी दिले. धुळे शहरा चे आमदार डॉ फ़ारुख शाह यांनी आपली स्वतः ची जमीन ऑक्सीजन प्लांट साठी देत आपल्या निधितुन 80 लाख रु. सुद्धा दिले तसेच रेमडिसिवर इंजिक्शन साठी 20 लाख रु दिले आहे.

शिवसेने चे आमदार बांगर यांनी सुद्धा 90 लाख रुपयाचा एफ डी मोडून आपल्या विधानसभा मधे बेड व रेमडिसिवर इंजिक्शन साठी दिले आहे. अशी मदत जालना जिल्ह्याती नेत्यांनी करावी. इतर जिल्ह्यातील नेत्यांसारखा आदर्श जालना जिल्ह्यातील नेत्यांनी घ्यावा असे आवाहन देखील शेख माजेद यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *