ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

फलटण कोरेगाव मतदार यादीबाबत आक्षेप असल्यास दोन दिवसात दुरुस्ती करण्याबाबत फलटण तहसिलदार समीर यादव यांचेआवाहन

August 7, 202114:14 PM 27 0 0

सातारा (प्रतींनिधी) :  फलटण- कोरेगाव विधानसभा मतदार संघातील मतदार यादीचे पुनर्निरीक्षण करण्यात आले आहे मतदार यादीतून कोणाचे नाव वगळले असल्यास व आक्षेप असल्यास तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत दोन दिवसांमध्ये समक्ष भेटून नोंदणी करून घ्यावी असे आवाहन तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी समीर यादव यांनी केले.


२५५, फलटण मतदार संघातील मतदार यादीत
मतदाराचे नाव आहे पण फोटो नाही असे सात हजार 726 मतदार आहेत .निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचे फोटो संकलित व वगळणेचे काम 2021 मध्ये केले आहे या संकेत स्थळावर प्रसिद्ध करूनही मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे फोटो जमा होत नाहीत ,संबंधित मतदार हे त्या-त्या यादी भागात राहत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे फोटो संकलित करणे शक्य होत नाही त्यामुळे मतदार यादीत नाव आहे परंतु फोटो नाही अशा मतदारांनी स्वतःचे फोटो नमुना नंबर आठ फॉर्म भरून आपल्या भागातील मतदान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तहसील कार्यालय निवडणूक शाखा फलटण यांच्याकडे जमा करावेत पण अद्यापही फोटो जमा झाले नसल्याने व मतदार यादी भागात राहत नसल्याचे दिसून आल्याने त्यांचे पंचनामे करण्यात आले आहेत मतदार यादीतून कोणाचे नाव वगळले असल्यास व याबाबत कोणाचाही आक्षेप असल्यास येत्या दोन दिवसात निवडणूक शाखेत येऊन समक्ष भेटावे व नाव नोंदणी करून घ्यावी फोटो नसलेली यादी https:/www.satara.gov.in/en/noticescategory/announcements
या संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध आहे असे तहसिलदार समीर यादव यांनी कळवले आहे

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *