ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आयोजित केलेल्या सेंट्रल बँकच्या जनसंपर्क व वित्तीय अभियानास फलटणच्या व्यापाऱ्यांचा भरघोस प्रतिसाद

July 7, 202213:06 PM 27 0 0

फलटण (सई निंबाळकर) : फलटण शहरातील व ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आयोजित केलेल्या सेंट्रल बँकेच्या जनसंपर्क व वित्तीय अभियानास व्यापाऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.सुरवडी ता.फलटण येथील हॉटेल जॅक्सन इन मध्ये पार पडलेल्या कार्यक्रमा प्रसंगी खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर व सेट्रल बँकेचे एमडी & सीईओ एम. व्ही. राव सर आणि पुणे झोनल ऑफिस चे महाप्रबंधक बी. बी. मुटरेजा यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले केंद्र सरकारने सुरू केलेल्या जनधन,मुद्रा,पी.एम.किसान,योजनेसह कोरोना सारख्या आर्थिक संकटात सापडलेल्या 30 टक्के व्यापारी लोकांना वीस लाख कोटीच्या पॅकेज मध्ये विनातारण अर्थसहाय्य केंद्र सरकारच्या मदतीने सेंट्रल बँकेने केले.त्याचबरोबर डॉक्टर व्यावसायिकांना दोन कोटी पर्यंतचे वित्तीय अर्थसाह्य होत आहे.त्यामुळे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.सेंट्रल बँकेचे एमडी आणि सीईओ एम. व्ही. राव सर यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करताना बँकेच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रमुख खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर हे नेहमीच सर्व बँकिंग विश्वाला सहकार्य करत असतात वेगवेगळ्या विषयांबरोबर शेती,व्यापार,संदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत असतात. खासदार निंबाळकर यांनी सांगितल्याप्रमाणे नवीन युवकांसाठी बँकिंग क्षेत्रात व व्यावसायिक क्षेत्रात सीएसआर योजना चालू करत असून त्याची सुरुवात फलटण शाखेतून करत असल्याचे यावेळेस एम. व्ही. राव सर यांनी सांगितले.त्याच बरोबर सर्व सामान्याची सुरक्षा हेच आपले प्राथमिक कर्तव्य आहे. देशाच्या जडण घडणीत सेन्ट्रल बँकेचे खूप मोठे योगदान राहिले आहे.सेंट्रल बँकेच्या वित्तीय अभियानाचा शेतकरी, व्यापारी, महिला बचत गट ,डॉक्टर यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे यावेळी सांगितले.

या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज वाटपाचे चेक देण्यात आले तसेच 100 Cr कर्ज मंजुरी चे पत्र वाटप मा. खासदार रणजित सिंह निंबाळकर आणि एम.व्ही. राव सर यांच्या हस्ते करण्यात आले.सेंट्रल बँकेचे बी.बी.मुटरेजा,श्री.जी.रामकृष्णन ,पी.एन.चौधरी,प्रदिप जाधव आणि फलटण शहरातील व परिसरातील असंख्य व्यापारी,शेतकरी, महिला बचत गट या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल पी.एन.चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *