ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

फुले – आंबेडकर जयंतीनिमित्त दसदिवशीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

March 31, 202214:40 PM 28 0 0

नांदेड – क्रांतीबा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात दि. १० एप्रिल पासून दस दिवशीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिराला सुरुवात होणार आहे. प्रत्येक महिन्यात दहा दिवसांचे श्रामणेर प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाते. दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्या वय वर्षे १४ आणि त्यापुढील बौद्ध उपासकांनी ९ एप्रिल पर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा आॅल इंडिया भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले आहे.
ऋषीपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे दहा दिवसीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ होणार आहे. या शिबिरात भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली भिक्ख संघरत्न, भिक्खू चंद्रमणी, भिक्खू धम्मकिर्ती, भिक्खू श्रद्धानंद, भंते सुनंद, भंते सुदत्त, भंते सुयश, भंते शिलभद्र, भंते सुमेध हा भिक्खू संघ नवदीक्षित श्रामणेरांना मार्गदर्शन करणार आहेत. हे शिबिर २० एप्रिलपर्यंत चालणार असून जवळपास पन्नासपेक्षा अधिक उपासक सहभागी होणार आहेत. त्यासाठी लवकरात लवकर शिबिरपूर्व नावनोंदणी करण्यात यावी असे प्रशिक्षण केंद्राच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *