ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पिरवाड समुद्रकिनारी साफसफाई

September 15, 202113:28 PM 7 0 0

उरण (संगीता ढेरे ) पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन, स्वच्छता विषयक जनजागृती करण्याच्या दृष्टीकोणातून सेव अवर बीच व क्रिएट टुगेदर फॉउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने उरण पिरवाडी समुद्र किनारी साफसफाई करण्यात आली.यावेळी समुद्रातून वाहून आलेला नैसर्गिक कचरा, समुद्रकिनारी फिरायला आलेले पर्यटक यांनी टाकलेले प्लास्टिक पिशव्या, दारूच्या बाटल्या, विविध कागदी प्लास्टिक वस्तू आदी एकत्र गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.


सेव अवर बिचचे अमोल दुरुगकर, आर्यन घरत, भूमिका सिंग, शिवा म्हात्रे तसेच क्रीऍट टूगेदर फॉउंडेशनचे दीपक विश्वकर्मा, रवी वर्मा, अभिषेक गुप्ता, असमान शेख, शोभना पिल्लई, शक्ती पिल्लई, हमीद शेख, प्राची फडके, सौरभ आदी सेव अवर बीच व क्रिएट टुगेदर फॉउंडेशनचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.स्वयंम स्फूर्तीने तरुणांनी केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे विविध सामाजिक संस्था, संघटनांनी कौतुक केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *