उरण (संगीता ढेरे) संगणक शिक्षण ही काळाची गरज अशी व्याख्या आज केली जात आहे जर संगणक शिक्षण नसेल तर माणूस साक्षर असून निरक्षर समजला जातो परंतु संगणक शिक्षण म्हणजे तांत्रिक शिक्षण देणारे निसर्गाच्या विषयी प्रचंड ओढ असणारी संस्थासाईकृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेंटर,कोप्रोली होय आणि संपूर्ण विश्व हे हरीत मय व्हावं अस स्वप्न उराशी बाळगत आजच्या कॉम्पुटर युगात विद्यार्थ्यांना कॉम्पुटर चे प्रशिक्षण देणाऱ्या MS-CIT कोप्रोली सेन्टर चे संस्थापक /प्रशिक्षक श्री. राकेश पाटील यांच्या प्रशिक्षण सेवेबरोबरच गेली अनेक वर्षे सतत नवनवीन सामाजिक उपक्रम राबविले जातात.
यावेळीही त्याचाच एक भाग म्हणून आज रविवार दि: 29 ऑगस्ट, 2021 रोजी, सारडे येथिल कोमनादेवी ऑक्सिजन पार्क परिसरात निसर्ग समतोल राखणे आणि सामाजिक वनीकरण म्हणून वृक्षारोपण करण्यात आले माणुस आज आधुनिक युगाकडे वाटचाल करीत असला तरी निसर्ग हाच खरा देव आहे आणि म्हणूनच या साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी कोप्रोली तर्फे कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे उरण मधे आपल्या विद्यार्थी समवेत आदरणीय राकेश पाटील सर यांनी आपल्या निसर्गाच्या प्रेमा पोटी वृक्षारोपण केले सदर कार्यक्रमास राकेश पाटील सर समवेत विद्यार्थी वर्ग तसेंच सुयश क्लासेस आवरे चे अध्यक्ष निवास गावड सर ,सारडे विकास मंचचे उपाध्यक्ष संपेश पाटील,खिजिंदार रोशन पाटील, कार्याध्यक्ष रोहित पाटिल,त्रिजन पाटील,प्रितेश पाटील याची उपस्थिती लाभली सर्वाचे मनःपूर्वक आभार
Leave a Reply