ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जागतिक वसुंधरा दीनानिमित्त रॉक ऍनिमल पार्क आणि वेश्वी डोंगर माथ्यावर केली दहा – बाराफुटी वटवृक्षाच्यां झाडांची लागवड

April 27, 202215:21 PM 35 0 0

उरण  (संगीता ढेरे ) : मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणातुन झालेला पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्यामुळे अचानक वातावरणात होणारे बदल,कधी अवकाळी पडणारा पाऊस तर कधी ढगफुटीमुळे उद्भवणारी महाभयंकर पूरस्थिती,चक्रीवादळं,अतिउष्णते मुळे होणारे ग्लोबलवार्मिंग त्यातून साऱ्या जगाला भोगावे लागणारे महाभयंकर दूरगामी परिणाम ह्यातून मानवाने काहीतरी बोध घेऊन निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे या दृष्टी कोणातून निसर्गाच्यां संवर्धनाप्रति जागरूक असणारी काही मंडळी सतत आपल्या माध्यमातून निसर्गसंवर्धनाच्या कार्यात मशगुल असतात त्यातलंच एक नाव म्हणजे सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर .रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर यांनी वेश्वी उरण येथील एकविरा देवी मंदिर डोंगर माथ्यावरील माळरानावर गेल्यावर्षी लागवड केलेल्या वटवृक्षाच्यां सभोवताली कुंपण करून त्याला मातीचा भराव केला.

त्यामुळे त्या वटवृक्षाच्यां झाडांना मजबुती मिळेल आणि अजून जोमाने वाढ होण्यास मदत मिळेल.त्याच सोबत आत्ताच काही दिवसांपूर्वी वेश्वी येथील एकविरा देवी मंदिर डोंगर पायथ्याशी असणाऱ्या रॉक ऍनिमल पार्क मध्ये राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून आणखी तीन हत्ती,सिंह, गरुड या प्राणी- पक्षांचे फायबरचे स्टेचू बसविण्यात आले. त्याच रॉक ऍनिमल पार्क मध्ये तब्बल दहा बारा फुटांच्या वटवृक्षाच्यां सहा झाडांची लागवड करण्यात आली.या अगोदर वड,पिंपळ,कडूलिंब,करंज जातीच्या अनेक झाडांची लागवड करून त्या झाडांची देखभाल आणि जोपासना करून तिथल निसर्ग सौंदर्य खुलवलं गेलं आहे. केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर आणि त्यांच्या सर्व सहकारी मंडळींनी खऱ्या अर्थाने निसर्ग संवर्धन आणि संरक्षणाच्या कार्यात एक नवा आदर्श निर्माण करून पर्यावरणाच्या संतुलनासाठी आणि ह्या वसुंधरेला हिरवा शालू पांघरण्यासाठी अनेक वृक्षांची लागवड करून निसर्गसंवर्धनासाठी आपले अनमोल योगदान दिले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *