ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गांधी जयंतीनिमित्त उलवेमध्ये प्लास्टिक डोनेशन ड्राईव्ह

October 9, 202114:15 PM 87 0 5

उलवे प्लास्टिक रीसायक्लोथॉन 2 ऑक्टोबर गांधीजयंतीच्या निमित्ताने “उलवे प्लास्टिक रीसायक्लोथॉन”च्या सम्पूर्ण टीमने उलवे मधील रहिवाश्यांना प्लास्टिक कचऱ्यामध्ये न टाकता वेगळा जमा करण्याचे आवाहन केले होते. उद्देश हा की प्लास्टिक कचऱ्यामध्ये जाऊन आपल्याच पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे.. तसे होऊ नये यासाठी जमा झालेले प्लास्टिक direct recycling ला पाठवणे.. आणि यासाठी उल्वेमधील रहिवाशी, सोसायटी तसेच लहान मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.. आणि एका दिवसात जवळ जवळ 200 किलो प्लास्टिक जमा झाले.
या मोहिमेसाठी बिन्सी त्रिभुवन, जयेश त्रिभुवन, सुजाता बानीक, दीपा मौर्य, रजनी म्यालवरम, लता शर्मा, सूरज भगत, रेखा चिरनेरकर आणि इतर सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.  एका दिवसाची प्रोसेस नाही तर प्रत्येकाने नियमितपणे प्लास्टिक वेगळे केले तर..एका दिवसाच्या पावसाने गटारे तुंबनार नाहीत..आणि आपल्याच घरात पाणी शिरणार नाही. तरी एक जबाबदार नागरिक म्हणून सर्वांनी प्लास्टिक कचऱ्यामध्ये न टाकता नियमितपणे वेगळे जमा करावे, असे आवाहन “उलवे प्लास्टिक रीसायक्लोथॉन” च्या टीमने केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *