ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

खेळाडूंनी जय-पराजयाची तमा न बाळगता खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

April 27, 202215:18 PM 40 0 0

जालना :  मानवी जीवनामध्ये खेळाला अनन्य साधारण महत्व आहे. खेळामुळे आरोग्य सदृढ राखण्यास मोठी मदत होते. खेळाडुंनी खेळामध्ये जय पराजयाची तमा न बाळगता आपल्या खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धा २०२२ चे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, गणेश नि-हाळी, उपजिल्हाधिकारी, श्री. बानापुरे, श्रीमती शर्मिला भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, महसुल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दैनंदिन जीवनामध्ये ताणतणावाखाली काम करावे लागते. यातूनच उदभवणाऱ्या अनेक आजारांचा सामना करावा लागल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होतो. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मन व शरीर तंदुरुस्त राहून त्यांच्यात कार्यक्षमता वाढावी. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्यामध्ये अनेक कला, गुण असतात. त्या कला,गुणांना वाव मिळावा, एक संधी या माध्यमातून मिळावी या उद्देशाने या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड येथे 5 ते 7 मे, 2022 दरम्यान होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उत्तम कामगिरी बजवावी व जिल्ह्याचा लौकिक वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त करुन सर्व खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२२ चे उदघाटन दीपप्रज्वलन तसेच आकाशात फुगे सोडुन करण्यात आले. प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी क्रीडास्पर्धा आयोजनामागची भूमिका विषद केली. सुत्रसंचालन संजय चंदन तर आभार प्रदर्शन उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर यांनी केले. यावेळी तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी संचलनाद्वारे उपस्थितांना मानवंदना दिली. या प्रसंगी प्रथम क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तदनंतर फुटबॉल, खो-खो, कबड्डी, धावणे, महिलांचे खो-खो, धावणे, थ्रोबॉल आणि जलतरण, बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी, स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. नांदेड येथे दिनांक 5 ते 7 मे 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेसाठी विजेत्या खेळाडुंची निवड करण्यात आली. कार्यक्रमास महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गणेश कावळे, सचिव संजय चंदन, तलाठी संघटनेचे अध्यक्ष विश्वास भोरे, वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष श्री. भोसले, कोतवाल संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग गिरे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष पी.बी.मते व सचिव पठाण याहया, व्ही.व्ही.म्हस्के-पाटील आदींची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *