ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोरोनाविषयक आॅनलाईन जनजागृतीसाठी कवी सरसावले एकोणचाळीसावी काव्यपौर्णिमा साजरी ; जनतेने त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन

March 30, 202113:24 PM 86 0 0

नांदेड – राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. अनेकांना लागण होत असल्याचे दिसून येत आहे. हजारो रुग्ण गृहविलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. तर अतिगंभीर रुग्णांनाच रुग्णालयात दाखल केले जात आहे. यातून मृत्यूचा आकडाही वाढत आहे. ही सततची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने आॅनलाईन काव्यपौर्णिमा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खबरदारीचा उपाय हीच कोरोनाची शृंखला तोडून टाकू शकते. जनतेने मास्क, शारिरिक अंतर आणि सॅनिटाईझर या त्रिसूत्रीचा काटेकोरपणे अवलंब करावा असे आवाहन कवी महाशयांनी केले. गूगल मीटवर घेण्यात आलेल्या काव्यपौर्णिमेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री शेख अनिसा , ज्येष्ठ कवी शरदचंद्र हयातनगरकर, काव्यपौर्णिमेचे संकल्पक गंगाधर ढवळे यांची उपस्थिती होती.

येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने फाल्गून पौर्णिमेनिमित्त आॅनलाईन पद्धतीने काव्यपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते. काव्यपौर्णिमा मालेतील एकोणचाळीसाव्या काव्यपौर्णिमेचे आॅनलाईन उद्घाटन तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करुन प्रज्ञा करुणा विहार देगावचाळ येथे आॅनलाईन पद्धतीनेच करण्यात आले. त्यानंतर घेण्यात आलेल्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमात कवींनी सहभाग नोंदवून कोरोनाविषयक आॅनलाईन जनजागृती केली. याद्वारे सर्वत्र पोहचविण्याचा मनोदय व्यक्त केला. काव्यपौर्णिमेत प्रारंभी कवी शरदचंद्र हयातनगरकर यांनी आता आपण कोरोनाचे श्राद्धं घालावयास पाहिजे अशी भूमिका घेतली तर शेख अनिसा यांनी होळी आणि रंगधूळ यांच्या संगमातून कोरोनाला जाळून नवयुगाचा रंगोत्सव खेळूया अशी भावना व्यक्त केली.काव्यपौर्णिमेचे संकल्पक गंगाधर ढवळे यांनी सहभागी होतांना मृत्यू शोधात आहे जीवनाच्या आणि जीवन मृत्यूकडे प्रवासत चालले आहे अशा आशयाची कविता सादर केली. बी. सी. पाईकराव यांनीही कोरोना रोखता येईल आणि कायमस्वरूपी आपण त्याला मूठमाती देऊ शकतो हा आशावाद व्यक्त केला. ग्रामीण कवी नागोराव डोंगरे यांनी होळी पेटवू या कोरोनाची ही गेय कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून घरीच राहा आणि काळजी घ्या हा संदेश आपल्या कवितांमधून दिला. या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन कवी नागोराव डोंगरे यांनी केले. प्रास्ताविक गंगाधर ढवळे यांनी तर आभार बी. सी. पाईकराव यांनी मानले. सदरील कार्यक्रम आॅनलाईन पद्धतीने प्रसारित करण्यासाठी मंडळाचे पांडूरंग कोकुलवार, कैलास धुतराज, मारोती कदम, शंकर गच्चे, प्रशांत गवळे, रुपाली वैद्य वागरे यांनी परिश्रम घेतले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *