ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दीनिमित्त काव्यग्रंथ आणि चित्रप्रदर्शनी

May 4, 202213:25 PM 27 0 0

नांदेड – बुध्द, फुले,शाहु, आंबेडकरी विचारांचे आजन्म प्रचारक तथा भीमगितांसाठी संपूर्ण जीवन झिजणारे, महान आंबेडकरी जलसाकार महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, त्यांच्या अनन्य साधारण योगदानाला अधोरेखित करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरीय महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्य संमेलनाचे आयोजन नांदेड शहरात करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शताब्दी कविता संग्रह प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच या निमित्ताने वामनदादांच्या फोटोंची चित्रप्रदर्शनी भरविण्यात येणार आहे. त्यासाठी वामनदादांसोबत असलेले तत्कालीन फोटो योग्य त्या माहितीसह येत्या १४ मे २०२२ पर्यंत आपल्या कविता व फोटो पाठवाव्यात असे संयोजन समितीचे अध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे यांनी कळविले आहे.
महाकवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. वामनदादा यांच्या जीवनकार्यावर आधारित तसेच समकालीन वास्तवाला अधोरेखित करणाऱ्या महाराष्ट्रातील १०० कविंच्या कवितांचा कवितासंग्रह संमेलनाच्या उद्घाटन सत्रात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येणार आहे. वामनदादांचे भीमकाव्य लक्षात घेता आजच्या उजेडाच्या हल्ल्यावरील कविता, सर्व गतिप्रक्रिया गिळायला लागलेल्या मूलतत्त्ववादाच्या मगरीवर, गगनभेदी महागाईवर आणि धर्मनिरपेक्षतेच्या आक्रंदनावर तसेच परिवर्तनाभोवती धिंगाणा घालणाऱ्या धर्मांधतेवर आधारित कविता अपेक्षित असून या आशयाच्या कविता मागविण्यात येत आहेत. तसेच देशभरातून विविध गायक, कलाकार, सर्व रसिक प्रेक्षक तथा दादांच्या चाहत्यांकडून दादांचे फोटो मागविण्यात येत आहेत.
इच्छुकांनी वामनदादांशी संबंधित फोटो योग्य त्या माहितीसह आणि कवींनी आपल्या रचना आपल्या संपूर्ण पत्ता, फोटो व मोबाईल क्रमांकासह संयोजन समितीचे कार्याध्यक्ष राज गोडबोले, पंचशील हायस्कूल समोर, गणेश नगर रोड वाय पाॅईंट, नांदेड येथे अथवा मो. क्र. ९८९०९४०२०३ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवाव्यात, असे कार्यवाह कोंडदेव हटकर, निमंत्रक जी. पी. मिसाळे यांनी कळविले असून संयोजन समितीचे एन.डी.गवळे, एन.टी.पंडीत, प्रभू ढवळे, डॉ. रामचंद्र वनंजे, रमेश कसबे, अशोक मल्हारे, ज्ञानोबा दुधमल, एम.एस.गव्हाणे, महेंद्र नरवाडे, अनंत ढवळे, नितीन एंगडे, संजय जाधव, पी.के.खानापूरकर, एम.डी.जोंधळे, आर .पी.झगडे आदी कवितासंग्रहाच्या निर्मितीसाठी व चित्रप्रदर्शनीसाठी परिश्रम घेत आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *