ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कामगार दिनानिमित्त रंगणार काव्य मैफल

April 30, 202213:57 PM 36 0 0

जालना : मुद्रा साहित्य सेवा संस्था व कामगार कल्याण केंद्र जालना यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनानिमित्त रविवारी ( दि.1 में ) कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. जालना शहरातील कामगार कल्याण केंद्रात सायंकाळी 6 वाजता ही काव्य मैफल रंगणार आहे. या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.बसवराज कोरे हे राहतील. कामगार कल्याण मंडळ अधिकारी जिज्ञेश पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन होणार असून ज्येष्ठ कामगार नेते अण्णा सावंत,ज्येष्ठ समाजसेविका रसना देहेडकर, प्रसिद्ध कवी कैलास भाले यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहिल.
या कवींचा सहभाग नारायण खरात, प्रदीप इक्कर, गीता खैरे, कृष्णा वाघ, डॉ.गणेश कंटूले, सुधाकर चिंधोटे, दिनेश शेळके, सुनील लोणकर, प्रा. पंढरीनाथ सारके, शिवाजी तेलंगे, मनिष पाटील, विनोद जैतमहाल, डॉ.प्रभाकर शेळके, प्रा.अशोक खेडकर, डॉ. दिगंबर दाते, रत्नमाला मोहिते, लक्ष्मीकांत दाभाडकर, वसंत सुर्यवंशी, डॉ.एकनाथ शिंदे, डॉ.राज रणधीर, साहिल पाटील, विनोद काळे, मिलिंद घोरपडे, बंडू काळे या निमंत्रित कवींची काव्य मैफल रंगणार आहे.
संयोजक रमेश देहेडकर,सुधाकर वाहुळे, शांतीलाल बनसोडे, डॉ.राजेंद्र गाडेकर, विठ्ठल वरपे, संजय कसबे,इलियास मोहियोद्दीन, प्रा. चारुशीला दाभाडकर, प्रा.ज्योती पोहेकर,अनिकेत वैष्णव, राजेंद्र जाधव, रामा सुपारकर,प्रा. डॉ.सुरेश गरुड, दीपक क्षीरसागर, नवनाथ लोखंडे तसेच गोतावळा परिवार यांनी या कवी संमेलनास जास्तीत जास्त संख्येने कवी व साहित्य प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.सुहास सदावर्ते हे करणार आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *