जालना/प्रतिनिधी येथील पोलिस दलात ई गव्हर्नन्सअंतर्गत क्राईम ॲण्ड क्रिमीनल हॉकिंग नेटवर्क (सीसीटीएनएस) प्रकल्पात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलिस कर्मचारी दौलत कानुले यांचा प्रशस्तीपत्र देवून गौरव केला आहे.
महाराष्ट्र पोलिस दलात ई गव्हर्नन्स अंतर्गत पोलीस अधीक्षक विनायक देशमुख तसेच अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विद्या झिरपे , रुपाली कपूर व दौलत कानुले हे सीसीएनटीएस प्रकल्पात काम करीत आहेत. या प्रकल्पानुसार ऑनलाईन एफआयआर, कॅरेक्टर, ई कम्पेन्ट यासह अन्य पोलिस ठाण्यात येणाऱ्या हार्डवेअर अडचणी सोडविण्यासाठी कानुले यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयात कानुले गेल्या तीन वर्षापासून कार्यरत आहेत. विप्रो जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांची नेमणूकही करण्यात आलेली आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Leave a Reply