ज्या बैलांच्या अथक परिश्रमामुळे आपण सर्वजण अन्नधान्य मिळवू शकतो त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे श्रावण महिन्यातील अमावस्या अर्थात पोळा. भारतामध्ये विविध प्रदेशात वेगवेगळ्या मुहूर्तावर हा सण साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी बैलांची पूजा केल्याने उत्सव साजरा केल्याने आपल्या घरातील गोवंशाची सुख-समृद्धीचे होते, भरपूर पीक येते याची अनुभूती शेतकऱ्यांनी घेतलेली आहे.
शेतकऱ्यांमध्ये या उत्सवाला फार महत्त्व आहे. पेरण्या पूर्ण होतात तेव्हा त्यानंतर बैलाला या कामातून सुटका मिळते आणि श्रावण अमावास्येच्या दिवशी त्याला न्ज्ञाउ, घालून त्याची पूजा करून त्याला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दिला जातो.आणि संध्याकाळी त्याचा साजशृंगार करून मिरवणूक काढली जाते. अत्यंत उत्साहाने व आनंदाने सर्वजण या उत्सवात सहभागी होतात. बैलांच्या अथक परिश्रमामुळे आपल्याला अन्नधान्य मिळते त्यांच्या बद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली जाते. चला तर आपण सर्वजण या सणाच्या निमित्त्याने हे सर्व जीवन जगत असताना आपल्याला विविध प्राणी व मनुष्य यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या प्रत्येक मदतीसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लावून घेऊया!
या बैलांच्या चरणी व गोधनाच्या चरणी पोळ्याच्या निमित्य अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करुया.
सौ.रोहिणी जोशी, संभाजीनगर
Leave a Reply