जालना ( प्रतिनिधी) : शहरातील स्वामी विवेकानंद हॉस्पिटल ते गोल्डन ज्युबली शाळा या रस्त्यावर चोऱ्यांचे वाढते प्रमाण आणि भविष्यातील धोके लक्षात घेऊन तातडीने पथदिवे बसविण्यासह पोलीस गस्त वाढवावी. अशी मागणी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष ॲड . महेश धन्नावत यांनी केली आहे .
नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या विषयांवर गुरुवारी ( ता.28) जिल्हाधिकार्यांना दिलेल्या लेखी निवेदनात ॲड . महेश धन्नावत यांनी म्हटले आहे , गोरक्षण पांजरपोळ येथे जॉगिंग ट्रॅक असून हॉस्पिटल मधील रुग्णांचे नातेवाईक , वॉकींग साठी जाणारे नागरिक तसेच छञपती संभाजी महाराज नगर, माणिक नगर,फाईन लिव्हिंग परिसरात वास्तव्यास असलेल्या व्यापारी बांधवांना मोंढा व व्यापारी पेठेत जाण्यासाठी सदर रस्ता सोयीचा ठरतो. असे नमूद करत ॲड . महेश धन्नावत यांनी व्यापारी श्रीकांत दाड यांच्या वर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून त्यांच्या कडील पैशाची बॅग हिस्कावन्याचा प्रयत्न केला. नुकतीच घडलेली घटना लक्षात घेऊन जेष्ठ नागरिक व महिला यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नगरपरिषदेच्या वतीने तात्काळ पथदिवे बसवावेत आणि पोलीस गस्त वाढविण्यासाठी आदेश द्यावेत. अशा मागण्या ॲड . महेश धन्नावत यांनी लेखी निवेदनात केल्या आहेत.
Leave a Reply