नांदेड – आंबेडकरी चळवळ ही साधारणतः साहित्य, राजकारण, आंदोलन आणि जलसे या चार स्तंभावर आधारलेली आहे. आंबेडकरी विचारधाराच आपल्याला सर्वच क्षेत्रात प्रगतीशील बनविते. समाजातील नेते, कार्यकर्ते इतर प्रस्थापित राजकीय पक्षांत आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे आंबेडकरी चळवळीच्या मुख्य प्रवाहाची पडझड होत असल्याचे दिसून येते. परंतु केवळ राजकीय पडझडीलाच आंबेडकरी चळवळ समजू नये असे प्रतिपादन येथील सप्तरंगी साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रणजित गोणारकर यांनी केले. यावेळी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, उपाध्यक्ष नागोराव डोंगरे महासचिव पांडूरंग कोकुलवार, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे, यु. डी. काटे, जी.एम. सालेगावे, उत्तम ढवळे, मनोज साखरे, प्रा. प्रकाश येलमे, सुरेश महाबळे, धम्म मित्र एम. टी. वाघमारे, एकनाथ कार्लेकर आदींची उपस्थिती होती. अनुरत्न वाघमारे यांनी बहुजनांच्या राजकीय चळवळीची मिमांसा केली. स्वातंत्र्यानंतरच्या पाऊणशे वर्षांच्या कालखंडात आपण एक सशक्त भूमिका घेऊ शकलो नाही, ही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
शहरातील उल्हास नगर परिसरात सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने रणजीत गोणारकर यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुष्प, दीप व धुपानेही पूजन संपन्न झाले. त्यानंतर कार्यक्रमास प्रारंभ झाला. यात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. विविध सत्रात के. आनंद, शंकर भिसे, शिवराज गोणारकर, व्ही. बी. कुरे, सुधीर मरवाळीकर, दिंगाबंर लोहबंदे, विनायक मांजमकर, गौतम खानापुरकर, गौतम धडेकर, दिंगाबर ढवळे, प्रभाकर घंटेवाड, डॉ. संघरत्न कुर्हे, अॅड. विजय गोणारकर हे उपस्थित होते. दरम्यान, खुरगावच्या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रातील
प्रशिक्षणप्रमुख भदंत पंय्याबोधी थेरो व भिक्खू संघाने भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गंगाधर ढवळे यांनी केले तर आभार अमोल गोणारकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीवन कांबळे, प्रकाश गोणारकर, रमेश गोणारकर, संदेश कांबळे, संदिप गोणारकर, सरस्वती गोणारकर, संजीव गोणारकर यांनी परिश्रम घेतले.
Leave a Reply