ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राजकारण आपलं होतं, पण जीव जनतेचा जातो; उद्धव ठाकरे

September 5, 202117:15 PM 28 0 0

मुंबई: लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याच्या मुद्दयावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मनसेला फटकारले आहे. अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झाली आहे. जरा धीर धरा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं, पण जीव जनतेचा जातो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि भाजपला फटकारले आहे.
कोविडच्य संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या “माझा डॉक्टर” या ऑनलाईन परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी राज ठाकरेंसह भाजपलाही फटकारलं. मला थोडसं आश्चर्य वाटतं. आपण सर्व गोष्टींची काळजी घेत असताना काही लोकांना अनेक गोष्टींची घाई झाली आहे. हे उघडा, ते उघडा, अमूक उघडा, तमूक उघडा, हे असं आहे, ते तसं आहे, असं काही लोक म्हणत आहेत. पण, मी सर्वांना सांगतो, थोडा धीर धरा. संयम धरा. आपण ज्या गोष्टी उघडत आहोत त्या पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ नये याची खात्री पटवून आपण पुढे जात आहोत. मग अशावेळी घाई गर्दी केली तर आपण आणखी काही वर्षे, काही महिने या संकटातून बाहेरच पडू शकणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
जनतेच्या जीवाशी खेळू नका
राज्यात अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत. पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी आहे. त्यांचे आरोग्य धोक्यात आणणारी तर नाही ना याचा विचार सर्वांनीच करायला हवा. अगदी राजकारण्यांनीही, आम्ही ही हा विचार करायला हवा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं. पण जीव जनतेचा जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका, असं आवाहन त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं. आंदोलन करायचे तर कोरोना विरुद्ध करा, असा टोलाही त्यांनी लगावला.


शत्रू पूर्णपणे पराभूत झालेला नाही
तिसरी लाट येऊच नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजचे. दुर्देवाने ती आलीच तर त्याची घातकता कमी व्हावी यादृष्टीने उपाययोजना आणि प्रयत्न सुरू आहेत. आज कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी दुसरी लाट पूर्णपणे ओसरलेली नाही आणि तिसऱ्या लाटेचा धोका सांगितला जात आहे. जगभरात तिसऱ्या लाटेचे थैमान सुरु आहे. अशा परिस्थितीत वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. तिसरी लाट आलीच तर त्याची घातकता कमी व्हावी हा त्यामागचा प्रयत्न आहे. आपला शत्रू अजून पूर्णपणे पराभूत झालेला नाही. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहणे आवश्यक, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दुसरी लाट अडचणीची ठरली
आरोग्य सुविधा मग ते ऑक्सिजन, रुग्णशय्या, औषधे, व्हेंटिलेटर्स यात आपण कुठेही कमी नाही. पण या सगळ्या गोष्टी सतत वापरात असल्याने त्यांची काळजी घेणे, यंत्रसामग्रीची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्व रुग्णालयांनी ऑडिट करून घ्यावे. गेल्या अनुभवातून आपण काय शिकलो हे महत्वाचे आहे. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट आपल्यासाठी अधिक अडचणीची ठरली आहे. आपली ऑक्सिजनची गरज अचानक वाढली. आपण इतर राज्यातून ऑक्सिजन मागवून घेऊन ही गरज भागवली, असं सांगतानाच राज्याची ऑक्सिजनची क्षमता दररोज 1200 ते 1300 मे.टन ही गरज मागच्यावेळी 1700 ते 1800 मे.टन एवढी वाढली. इतर राज्यातून आपण ऑक्सिजनची गरज भागवली. पण त्या राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास आपल्याला त्या राज्यातून ऑक्सिजन मिळत नाही, तो ऑक्सिजन ते राज्य त्यांच्या राज्यातील रुग्णांसाठी वापरतात ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी आपल्या ऑक्सिजनच्या क्षमतेतच उपाययोजना करण्याची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दोन डोस घ्याच
पावसाळा सुरू आहे. डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याकडेही लक्ष देण्याची गरज. कोविड नसला तरी डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांची काळजी घेण्याची गरज आहे. लसीचे दोन्ही डोस घ्या. पण लस घेतली तरी सार्वजनिक ठिकाणी, चारचौघात वावरतांना काळजी घ्या, मास्क नक्की लावा. माझा डॉक्टरांनीही आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना यासंबंधी सांगून जनजागृती करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
लाट येऊ द्यायची की थोपवायची? तुम्हीच ठरवा
आता सणवाराचे दिवस सुरू झाले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत आता अनेक गोष्टी आपण खुल्या केल्या आहेत. गेल्यावर्षी सणवारानंतर, गणेशोत्सवानंतर दुसरी जोरदार लाट आली. यावर्षी रुग्णसंख्या याआधीच वाढतांना दिसत आहे. त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आपल्याला तिसरी लाट येऊ द्यायची नाहीच. ती थोपवायची आहे. राज्यातील नागरिकांनी ही लाट थोपवायची की तिला निमंत्रण द्यायचे हे ठरवावे. कोरोना विरुद्ध युद्ध करताना आपली शस्त्रे परजवून ठेवण्याची हीच वेळ आहे, असंही ते म्हणाले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *