ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरणमध्ये २ तरुणांवर पोस्कोचा गुन्हा दाखल; आरोपी अटक

August 7, 202113:49 PM 44 0 0

उरण प्रतिंनिधी (संगीता ढेरे ) :उरणमधील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी जयेश पाटील व मनीष देवरे यांच्यावर पोस्कोचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.


१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला मार्च ते मे २०२१ या दरम्यान आरोपी जयेश पाटील याने माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्याशी लग्न करीन असे आमिष दाखवित नागाव येथील एका रूमवर जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. तर मनीष देवरे याने एप्रिलमध्ये इन्स्टाग्रामवर मैत्री करीत भेटावयास बोलावून नवीन शेवा येथील एका पडक्या इमारतीमध्ये नेऊन माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगून जबरदस्तीने कपडे काढून शरीर संबंध केले. या शरीर सबंधातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने सदरचा प्रकार उघडकीस आला आहे.
उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्याकडे तक्रार दाखल होताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी जयेश पाटील व मनीष देवरे याना अटक करून पोस्कोचा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा रजिस्टर नंबर २३६/२०२१भादवी कलम ३७६, ३७६(२) (एन) महाराष्ट्र बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा २०१२ चे कलम ४,५ (जे) (२) (एल) सहवाचन कलम ६, कलम ८ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि प्रकाश पवार यांनी गुन्हा दाखल केला आहे. तर पुढील तपास मसपोनी वृषाली पवार या करीत आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *