भूमिपुत्र या देशाचा
तु जग पोशिंदा
सांडे रक्त मातीत
खाई परका मलींदा
रातदिन कष्ट तुझे
जीवाचे करतो हाल
मेहनताना उरत नाही
सरते शेवटी साल
राहतो सदा दु:खात
आणतो हसु ओठी
हक्क नष्ट करण्या
सरकार खेळती गोटी
पोशिंदा जगला पाहीजे
निर्धार पक्का रयतेचा
त्याच्या हक्कासाठी
साथ राहील सर्वांचा
-अरविंद झाडे
Leave a Reply