ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने तालुका विधी सेवा उरण यांच्यामार्फत प्रभात फेरीचे आयोजन

October 2, 202115:06 PM 6 0 0

उरण(संगिता पवार) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचेमार्फत दिनांक ०२/१०/२०२१ ते १४/११/२०२१ या कालावधीत आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्याच्या निर्देशानुसार देशाभिमान व्यक्त करण्यासाठी व कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी दिनांक ०२/१०/२०२१ रोजी तालुका विधी सेवा समिती, उरण यांचे मार्फत उरण शहरात सकाळी ९ वा. प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. प्रभात फेरीमध्ये उरण न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश माननीय श्री. निलेश एम. वाली, सह दिवाणी न्यायाधीश श्री. राहुल बी. पोळ, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश प्रियांका एन. पठाडे तसेच उरण न्यायालयातील विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, पोलिस कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

प्रभातफेरीस शुभारंभ करण्यापूर्वी दिवाणी न्यायालय क. स्तर, उरण येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर प्रभातफेरीस सुरुवात करून स्टेट बँकेच्यासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. सदर प्रभात फेरी उरण न्यायालयापासून ते राजपाल नाका, राघोबा मंदिर, कोट नाका, चारफाटा, पालवी हॉस्पिटल, अशी मुख्य रस्त्याने काढण्यात आली. त्यामध्ये कायदेविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने उरण शहरात प्रभात फेरीचे आयोजन करून तालुका विधी सेवा समिती, उरण यांचे मार्फत कायदेविषयक जनजागृती करत आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *