ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जासई विद्यालयात हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रभात फेरी संपन्न

August 10, 202213:52 PM 15 0 0

उरण ( संगिता  पवार ) :  रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनियर कॉलेज जासई. या विद्यालयात हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रचार प्रसिद्धीसाठी सोमवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीचे उद्घाटन कामगार नेते भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री व स्थानिक व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष मा.श्री सुरेश पाटील साहेब यांच्या हस्ते  करण्यात आले .तसेच विद्यालयाचे चेअरमन मा.श्री अरुण जगे साहेब यांच्या हस्ते पूजन करून प्रभात फेरीला सुरुवात करण्यात आली.
या फेरीमध्ये इयत्ता आठवी ते अकरावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. ही प्रभात फेरी जासई मधून गावभर फिरून परत माघारी विद्यालयांमध्ये आणली गेली, विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा झेंडा तसेच देश प्रेमावर घोषवाक्य फलक देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी देश प्रेमावर घोषणा देऊन तसेच देश प्रेमावर विविध देखावे ,वेशभूषा करून विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,शहीद भगतसिंग व राजगुरू तसेच रणरागिनी ताराबाई यांची वेशभूषा केलेला देखावा  गावातील लोकांचे लक्ष आकर्षण करून घेणारा होता.या प्रभात फेरीसाठी जासई ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच श्री संतोष घरत, माजी सभापती श्री.नरेश घरत,ग्रामसेवक,तसेच उरण पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील श्रीमती अनिता काटले मॅडम प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या.
या विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे यामध्ये वक्तृत्व स्पर्धा ,निबंध स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा ,देश प्रेमावरील गीत गायन स्पर्धा, विद्यार्थ्यांना उद्बोधन व मार्गदर्शनाचे असे विविध कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत .या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर श्री अरुण घाग साहेब यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे तसेच रयत सेवक संघाचे महाराष्ट्राचे समन्वयक श्री नुरा शेख सर, गुरुकुल विभाग प्रमुख श्री म्हात्रे जी.आर .सर,ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री शिंदे एस. एस. व विद्यालयातील इतर सर्व सेवकवर्गांचा हिरीरीने सहभाग मिळत आहे.

 

परंतु पोलीस यंत्रणा लक्ष केंद्रित करत नाहीत.याचा फायदा उठवत सध्या अज्ञात गुरे चोरणाऱ्या टोळीने नागाव ग्रामपंचायत हद्दीत हैदोस घातला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी आता या संदर्भात न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न आम्हा शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा राहिला आहे.एकंदरी पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याने भयभीत व सैरभैर झालेली गुरेढोरे स्वताच्या बचाव करण्यासाठी रहिवाशांच्या रहदारीच्या रस्त्यावरुन सुरक्षित ठिकाण शोधण्यासाठी जात असल्याचे चित्र उरण परिसरात सर्रास पाहायला मिळत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *