अत्यंत प्रतिकूल हवामानाशी निगडित घटना आणि नैसर्गिक आपत्ती यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हवामानातील अनिष्ट पालटाच्या मागे मानवाचा हात आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. प्रश्न हा आहे की, कोव्हिड 19 आणि हवामानातील पालट यांचा परस्पर संबंध आहे का ? मानवाने योग्य साधनेला आरंभ केला आणि ती नियमित ठेवून वाढवत नेली, तर स्वतःमध्ये, तसेच स्वतः भोवती सात्त्विकता निर्माण होते. त्यामुळे वातावरणात जरी अनिष्ट पालट झाले, तरी साधना करणार्यांना आगामी आपत्काळात दैवी साहाय्य लाभून त्यांचे रक्षण होऊ शकते, तसेच साधना करणार्याला येणार्या विविध संकंटांचा सामना करण्यासाठी बळ मिळतेे, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क यांनी शोधनिबंधाच्या सादरीकरणाच्या वेळी केले. त्यांनी माँत्रिअल, कॅनडा येथे झालेल्या 14 व्या ग्लोबल स्टडीज कॉन्फेरेन्स : लाइफ अफ्टर पँडेमिक : टूवर्ड अ न्यू ग्लोबल बायोपॉलिटिक्स ? या आंतरराष्ट्रीय परिषदेत कोरोना विषाणू आणि हवामानातील पालट यांबद्दल आध्यात्मिक दृष्टिकोन – ते परस्पर संबंधित आहेत का आणि ते कसे टाळू शकतो ?, हा शोधनिबंध सादर केला. ग्लोबल स्टडीज रिसर्च नेटवर्क अॅन्ड कॉमन ग्राऊंड रिसर्च नेटवर्क हे या परिषदेचे आयोजक होते. या शोधनिबंधाचे लेखक परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत, तर श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने वैज्ञानिक परिषदांत केलेले हे 73 वे सादरीकरण होते. यापूर्वी विश्वविद्यालयाने 15 राष्ट्रीय आणि 57 आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी 4 आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये विश्वविद्यालयाला सर्वोत्कृष्ठ शोधनिबंध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
हवानामातील या हानीकारक पालटाबद्दल काय करू शकतो ? याबद्दल सांगताना श्री. शॉन क्लार्क म्हणाले की, या समस्येचे मूलभूत कारण आध्यात्मिक असल्याने हवामानातील सकारात्मक पालट आणि त्याचे रक्षण यांसाठीची उपाययोजनाही मूलतः आध्यात्मिक स्तरावर असणे आवश्यक आहे. संपूर्ण समाज योग्य साधना करू लागला, तर हवामानातील हानीकारक पालट, नैसर्गिक आपत्ती, महामारी, तिसरे महायुद्ध अथवा अन्य संकटे यांमुळे येऊ घातलेल्या भीषण आपत्काळाचा सामना करता येईल.
Leave a Reply