ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

प्रदिप कुंभार यांना सातारा जिल्हा परिषदेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

September 9, 202122:23 PM 51 0 1

सातारा प्रतिनिधी,(विदया निकाळजे ) प्रदिप कुंभार यांना सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते बहुउद्देशीय सभागृह,जिल्हा परिषद सातारा येथे प्रदान करण्यात आला.या वेळी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. प्रदिप कुंभार हे कराड तालुक्यातील शेरे या ठिकाणी कार्यरत असून त्यांनी आपली शाळा 100% डिजिटल करून शाळेची रंगरंगोटी पूर्ण केली आहे.कोविड 19 च्या काळात शाळा बंद असल्या तरी त्यांनी विविध शैक्षणिक नाविन्यपूर्ण उपक्रम ऑनलाईन / ऑफलाईन राबविले आहेत.सर्व उपक्रमांची नोंद घेऊन त्यांना आदर्श शिक्षक म्हणून जिल्हा परिषद सातारा ने गौरविले आहे. पहिली ते चौथीच्या संपूर्ण अभ्यासक्रम व्हिडीओ निर्मितीमध्ये त्यांनी सहभाग घेतला.महाराष्ट्र एडमिन पॅनल शिक्षक टीम मधील सर्वानी मिळून पहिली ते चौथीच्या सर्व इयत्तांच्या , सर्व विषयांच्या पुस्तकातील सर्व घटक व उपघटकावर घटक निहाय सर्व अभ्यासक्रम व्हिडीओ निर्मिती केली. त्या निर्मिती मध्ये प्रदिप कुंभारांनी भाग घेतला.

जिल्हा परिषद सातारा ने १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन टेस्ट निर्मिती केली . याच्यामध्ये पहिली ते आठवीच्या वर्ग निहाय व विषय निहाय ऑनलाईन टेस्ट त्यांनी बनविल्या आहेत. प्रदिप कुंभारांनी शिक्षक मंच साताराच्या माध्यमातून रोज इयत्ता निहाय ऑनलाईन टेस्ट तसेच दर रविवारी साप्ताहिक टेस्ट हा उपक्रम राबविला. या उपक्रमांमध्ये आठवड्याच्या अभ्यासक्रमावर आधारित ऑनलाइन टेस्ट दर रविवारी दिली जात होती. सामान्यज्ञानाच्या ऑनलाइन टेस्ट या ५० टेस्ट ची मालिका उपक्रम प्रदिप कुंभारांनी वैयक्तिक राबविली. टेस्ट सोडवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन डिजिटल प्रमाणपत्रही देण्यात आले. डायट सातारा यांच्या माध्यमातून मेंटर प्रशिक्षक व सीआरजी सदस्य म्हणून रेठरे बु केंद्रासाठी प्रदीप कुंभार यांनी ऑनलाईन मार्गदर्शकाचे काम केले. डायट सातारा यांच्या माध्यमातून दर महिन्याला घेतल्या जाणाऱ्या सर्व शिक्षण परिषदांमध्ये प्रदीप कुंभार यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे.


कराड पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे यशवंत शिष्यवृत्ती पॅटर्न अंतर्गत शिष्यवृत्तीच्या ऑनलाइन टेस्ट उपक्रम घेण्यात आला आहे. या उपक्रमांमध्ये त्यांनी टेस्ट तयार केल्या आहेत. प्रदीप कुंभारांनी अनेक वेबीनार मध्ये शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेबिनारच्या माध्यमातून अनेक शिक्षकांपर्यंत तंत्रज्ञानाचे महत्व ,नवोपक्रम, नाविन्यपूर्ण अँप्स,आधुनिक शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर मार्गदर्शन केले आहे. प्रदिप कुंभारांनी त्यांच्या १००% डिजिटल वर्ग व ISO मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शेरे शाळेमध्ये विविध ऑफलाईन व ऑनलाईन उपक्रम राबवले.कोविड काळात शाळेची रंगरंगोटी पूर्ण केली.कोविड १९ च्या काळात शाळा बंद परंतु शिक्षण सुरू याच्या अंतर्गत शाळेमध्ये झूम ,गुगल मीट यांच्या माध्यमातून ऑनलाइन वर्ग घेतले.त्याच पद्धतीने विद्यार्थी गृहभेटी, व्हाईस कॉल ,ग्रुप मेसेज, कॉल कॉन्फरन्स, अभ्यासमित्र, शाळा आली दारी,रोजचा अभ्यास या उपक्रमांचा वापर केला. त्याच पद्धतीनं शाळेसाठी व वर्गासाठी व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्यामधून अभ्यास देणे, त्याचप्रमाणे गूगल, यूट्यूब,विविध शैक्षणिक सॉफ्टवेअरचा वापर , शैक्षणिक वेबसाईटचा वापर,शैक्षणिक व्हिडिओ,नवोपक्रम, शैक्षणिक ॲप्स,दीक्षा अँप, यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांसाठी केला.या कोविड १९ च्या काळात राज्य शासनाचे व जिल्हा प्रशासनाचेही शैक्षणिक उपक्रम आले.याच्यामध्ये प्रामुख्याने व्हाट्सअँप स्वाध्याय, शैक्षणिक दिनदर्शिका,गोष्टींचा शनिवार,टीलिमिली, कृती पत्रिका,शैक्षणिक सर्वेक्षण, ऑनलाईन मार्गदर्शक उपक्रम तसेच नवनवीन विविध उपक्रम शाळा व वर्ग पातळीवर यशस्वीरीत्या राबवले.
शाळा बंद शिक्षण सुरू उपक्रमांमध्ये प्रदीप कुंभारांनी अनेक शैक्षणिक व्हिडीओची निर्मिती , शैक्षणिक ब्लॉग,स्मार्ट पीडीएफ,पिडीएफ,पिपिटी,ऑनलाइन टेस्ट व क्विज , शैक्षणिक गेम यांची निर्मिती शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी केली.त्यांच्या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. कोविड १९ कालावधीमध्ये आरोग्य विभागाच्या कोविड १९ लसीकरण मोहिमेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून लसीकरण विभागांमध्ये प्रदिप कुंभार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र शेरे येथे काम केले. त्याच पद्धतीने जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती कराड अंतर्गत कोरोना प्रसार कमी व्हावा,कोविड १९ चे नियम नागरिकांनी पाळावेत यासाठी नेमणूक केलेल्या भरारी पथकामध्ये देखील त्यांनी काम केले. कोविड १९ चा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून कोविड १९ वर आधारित ऑनलाईन चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा त्यांनी घेतल्या . स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्यांना ऑनलाईन डिजिटल प्रमाणपत्र देखील दिले.यातील काही उपक्रम वैयक्तिक तर काही उपक्रम सर फाउंडेशन सातारा,शिक्षक मंच सातारा व महाराष्ट्र एडमीन पॅनल यांच्या सोबत राबविले. अशा पद्धतीने प्रदिप कुंभारांनी अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले असून याचा फायदा सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना होत आहे.या सर्व उपक्रमांची नोंद घेऊन त्यांना नुकताच जिल्हा परिषद सातारा च्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.प्रदिप कुंभाराच्या या विविध उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *