ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अष्टभुजा हिरकणी च्या वतीने Her heigh nest या संकल्पनेच्या उद्गात्या प्रज्ञा पोंक्षे मॅडम यांच्या व्याख्यान संपन्न

September 27, 202115:34 PM 5 0 0

विदया निकाळजे, (सातारा)अष्टभुजा हिरकणी च्या वतीने , 26 सप्टेंबर रोजी Her heigh nest या संकल्पनेच्या उद्गात्या प्रज्ञा पोंक्षे मॅडम यांचे ऑनलाईन मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते .’ स्त्री ‘च्या जीवनामध्ये घर हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा ,अस्मितेचा आणि आत्मसन्मानाचा असतो ,सुरक्षिततेचा असतो म्हणून प्रत्येक स्त्रीचं स्वतः च घर असलं पाहिजेच तिने स्वतःच्या अस्तिवाचा विचार आधी केलाच पाहिजे .

असे आपल्या व्याख्यानातून सर्व महिलांना आवर्जून सांगितले.प्रत्येक महिलेने स्वतःचे घर स्वतः बांधण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे त्यासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे ,तसेच महिला ही मुळातच कष्टाळू आणि प्रामाणिक असते तिच्यात प्रत्येक आव्हानाला पेलण्याची ताकद असते .त्यामुळे ती कोणताही संकल्प पूर्णत्वास नेऊ शकते . महात्मा फुलेंनी स्त्रियांना शिक्षण दिलं आणि म्हणूनच स्त्री आज प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे फक्त तिचा आत्मविश्वास उंचावला पाहिजे असंही त्यांनी सांगितले त्यासाठी प्रत्येक महिलेला वाटेल ती मदत,मार्गदर्शन करण्यासाठी त्या केव्हाही तत्पर आहेत हेही त्यांनी सांगितले व आपल्या व्याख्यानातून महाराष्ट्र भरातील महिलांना प्रेरणादायी संदेश दिला आहे

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *