औरंगाबाद :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे सहाय्यक संचालक प्रमोद धोंगडे यांची जिल्हा माहिती अधिकारी, जालना या पदावर पदोन्नती झाली यानिमित्ताने विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय व माहिती केंद्र औरंगाबाद कार्यांलयाकडून आज श्री.धोंगडे यांचा यावेळी सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला.
खडकेश्वर येथील संचालक कार्यालयात आज श्री. धोंगडे यांचा जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन स्वागत केले. याप्रसंगी माहिती अधिकारी मीरा ढास, माहिती सहायक संजीवनी जाधव, श्याम टरके, तसेच तिन्ही कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. मराठवाडा विभागाच्या सहाय्यक संचालक पदाची सुत्रे जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती अधिकारी मीरा ढास यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. श्री.धोंगडे यांनी यापूर्वी मंत्रालय, हिंगोली, अकोला, अमरावती, आदी ठिकाणी विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत.
Leave a Reply