ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शालापूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न

April 27, 202215:15 PM 35 0 0

मुरुड जंजिरा (प्रतिनिधी सौ नैनिता कर्णिक ) : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,पनवेल आणि पंचायत समिती शिक्षण विभाग, मुरूड जंजिरा यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषद मुरुड जंजिरा शाळा नं २ येथे शाळा पूर्व तयारी अभियान अंतर्गत पहिल्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रशासनाधिकारी दिपाली दिवेकर मॅडम, शाळा प्रमुख मंगल मुनेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रोहिणी सावकार,उपाध्यक्ष रोहन नशाणदार,सदस्य पांडुरंग चव्हाण,सदस्या , पत्रकार नैनिता कर्णिक माजी केंद्रप्रमुखा अनघा चौलकर ,बालवाडी शिक्षिका सोनाली पैर,शिवानी रणदिवे ,घराणे पालक,विद्यार्थी,शिक्षकवृंद उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.
सहशिक्षिका सायली गुंजाळ यांनी सर्व मान्यवर,व उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन शब्द सुमनाने स्वागत केले. तद्नंतर शालापूर्व तयारी मेळाव्याविषयी महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमा विषयी प्रतिपादन केले. मनोगतात अनघा चौलकर व कर्णिक यांनी मेळाव्याला शुभेच्छा देऊन ह्या मेळाव्यामुळे शिक्षक,पालक,विद्यार्थी यांच्यात समन्वय साधला गेल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत वाढ होईल त्यांना जून 2022 मध्ये इयत्ता पहिली दाखल करून घेण्यास आवश्यक त्या .क्षमता पाप्त होतील . हा मेळावा अतिशय स्तुत्यच असल्याचे निदर्शनास आणून दिले. मेळाव्याचे औचित्य साधून महात्मा फुले सहकारी पतसंस्था मुरूड जंजिरा यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना
बचतीची सवय लागून पुढील भविष्यात तरतुदीसाठी कसा उपयोग होतो हे सहशिक्षिका सायली गुंजाळ यांनी उदाहरणाद्वारा स्पष्ट करून मंत्र ही दिला. बचत करावी थोडी रोज भविष्य सुरक्षित राहील चोख  थेंबे थेंबे साचे तळे सुखी राहतील मुले बाळे सर्व विद्यार्थ्यांना पैसे साठविण्यासाठी डबे देऊन बचत करण्यास सांगितले. शाळा क्रमांक २ शाळा प्रमुख मंगल मुनेकर मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून मेळाव्याचा समारोप केला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *