ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सुर उरणकरांचा प्रस्तुत, यादों -का सफर गाण्याच्या कार्यक्रमास रसिक श्रोत्यांचा उत्सुर्त प्रतिसाद

March 13, 202212:14 PM 69 0 0

उरण (सौ. तृप्ती भोईर) : मंगेशकर स्मृती प्रित्यर्थ “स्वर सुमनांजली” हा गाण्यांचा कार्यक्रम शनिवार दिनांक १२ मार्च २०२२ रोजी ,ठिकाण- श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, विमला तलावाच्या बाजुला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, व प्रत्येक गाण्यांस वन्स मोअर घेत पार पडला. सुर उरणकरांचा प्रस्तुत यादों – का – सफर नावाने सुरेल गीतांचा हा नजराणा उरणमधील गायिका पुनम पाटेकर यांच्या नेतृत्वाने उरण मधील इतर नवोदित स्त्री पुरुष गायकांना एकत्र करून फार सुंदररित्या सादर केला . गानकोकिळा स्वर्गीय लता दीदी यांच्या पवित्र आणि अजरामर स्वरस्मृतींना आदरांजली म्हणून या कार्यक्रमाची निर्मिती केली गेली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. गौरी मंत्री यांनी केले. सौ. गौरी मंत्री यांच्या सुरेल गळ्यातुन “तुज मागतो मी आता ” या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मराठी गीत जे प्रत्येक मराठी माणसाच्या ओठांवर आहे ते म्हणजे “मेंदीच्या पानावर” , तुने ओ रंगीले , मैने प्यार किया, हम आपके है कोन? अशा मराठी हिंदी सुप्रसिद्ध चित्रपट व त्यातील सुप्रसिद्ध गाण्यांचा बहारदार कार्यक्रमाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात सादर झालेल्या अनेक गाण्यांना युगुल गीतांना वन्स मोअर देत श्रोत्यांची दाद मिळाली. “ये मेरे वतन के लोंगों ” या देशभक्ती मना मनात जागृत करणाऱ्या स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या गीतीने कार्यक्रमाची सांगता झाली. श्रोत्यांना शेवटपर्यंत खुर्चीवर खिळवून ठेवून या कार्यक्रमातील कलाकारांनी टाळ्यांची दाद मिळवली.
आतापर्यंत सुर उरणकरांचा प्रस्तुत या गीत चमुने “दिवाळी पहाट” व आत्ताच झालेला हा “यादों-का – सफर ” या कार्यक्रमातुन उरण रसिकांना त्यांच्या गानशौकीनांची आवड जपण्यासाठीची संधीच मिळवून दिली.सुर उरणकरांचा प्रस्तुत यादों-का-सफर या कार्यक्रमांत सुरेल गायन केलेल्यांची नावे :- स्त्री गायिका :- पुनम पाटेकर , गौरी मंत्री, अनिता घरत, अनघा म्हात्रे, निमा भानुशाली, प्रज्ञा पेडणेकर.
पुरुष गायक :- महेश घरत, सचिन वैद्य, विनोद ठाकुर, अंबरीश म्हात्रे, गणेश जाधव, भरत शेळके, दिनानाथ डांगे, योगेश भस्मे ,राजेश डांगे. आदी गायकांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *