ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्रची जालना जिल्हा पदाधिकारी निवडणूक संपन्न अध्यक्षपदी शेळके, सरचिटणीसपदी जोशी यांची सर्वांनुमते निवड

October 8, 202113:47 PM 38 0 0

जालना । प्रतिनिधी – प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्रची जालना जिल्हा पदाधिकार्‍यांची निवडणूक गुरुवार (दि 07) रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. जालना जिल्हा अध्यक्ष म्हणून दीपक श्रीकृष्ण शेळके यांची तर जिल्हा सरचिटणीसपदी महेश कृष्णाजी जोशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्राचे राज्य सरचिटणीस विजयकुमार सकलेचा यांनी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. सर्वांनुमते निवडण्यात आलेल्या या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी सय्यद रफिक (बदनापूर), नरेंद्र जोगड (घनसावंगी), शेख चांद पी जे, प्रभुदास भालेराव, गणेश काबरा यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्षपदी शेख इलियास अब्बास, सहकोषाध्यक्षपदी शांतीलाल बन्सवाल, सहसचिवपदी अनुजा निकाळजे, गोपाल त्रिवेदी, प्रसिद्धी प्रमुखपदी सिताराम तुपे यांची तर कार्यकारिणी सदस्यांमध्ये शेख गुलाबनबी सिपोराकर, प्रा. वाहेद पटेल, श्रीकिशन झंवर, ओमप्रकाश शिंदे, सय्यद नदिम यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.


या निवडणुकीनंतर नविन पदाधिकार्‍यांच्या सर्वसंमतीने सुभाष भालेराव यांना प्रदेश प्रतिनिधी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणुक प्रक्रिया पार पडली. निवडणुकीनंतर कॉन्सील राज्य अध्यक्ष इलियास खान व राज्य सरचिटणीस यांच्या हस्ते सर्व पदाधिकार्‍यांना एकमताने निवडून आल्यासंदर्भात निवडीचे पत्र दिले.
कार्यक्रमाप्रसंगी सी ए गोविंद प्रसाद मुंदडा यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले. तसेच भविष्यात पत्रकारांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. तसेच श्री मुंदडा यांनी प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना कमिटीसाठी मदत म्हणून पाच हजार रुपये देण्याची घोषणा ही केली.
यावेळी बोलतांना प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्राचे राज्य सरचिटणीस विजयकुमार सकलेचा यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करतांना श्री सकलेचा म्हणाले की, केवळ कॉन्सीलचे सदस्य अथवा सभासद असलेल्या पत्रकारांचा विचार न करता जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी एकदिलाने काम करावे, द्वेष भावनेतून नविन पदाधिकार्‍यांनी कार्य करू नये, तसेच जिल्हा अंतर्गत तालुक्यांच्या निवडणुका घेऊन तेथील पदाधिकार्‍यांचही घोषणा करण्यात यावी. तालुक्याच्या ठिकाणीही याच पद्धतीने निवडणुक कार्यक्रम राबविण्यात यावेत. याशिवाय जिल्ह्यात काम करतांना अडी-अडचण आल्यास राज्य कमिटीच्या सदस्य-अध्यक्षांशी समन्वय साधत त्यावर मार्ग काढावा असेही श्री सकलेचा म्हणाले.
कॉन्सीलचे राज्य अध्यक्ष इलियास खान यांनी राज्यातील कॉन्सीलच्या सर्व सदस्यांचा अपघाती विमा काढणार असल्याची घोषणा यावेळी केली. त्याचबरोबर कॉन्सीलच्या 620 रुपये असलेल्या फिस संदर्भात नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांनी लक्षात आणून दिलेल्या बाबीवर बोलतांना त्यांनी क्रियाशील सदस्य आणि जिल्हा सदस्य अशी विभागणी करण्याचा निर्णयही घेतला. यात क्रियाशिल सदस्यांना 620 रुपये तर जिल्हा सदस्यांसाठी 220 रुपये भरण्याची तरतूद करण्यात आल्याचीही घोषणा त्यांनी केली. मात्र, जिल्हा सदस्य हे केवळ जिल्ह्यांपुरतेच मर्यादीत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीस महेश जोशी यांनी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना सोबत घेऊन संघटनेचे कार्य करणार असल्याचे सांगितले. समन्वय साधून जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक शेळके यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्हा या मुख्यालय ठिकाणी वृत्तपत्रांच्या कार्यालयात येण्या-जाण्याचे काम असते. त्यातच त्याभागातील पत्रकारांना हवे तसे मानधन मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून येणार्‍या पत्रकारांंसाठी जिल्हा अंतर्गत बस प्रवास मोफत करण्यासाठी शासन दरबारी यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे श्री शेळके यांनी सांगितले.
प्रसंगी शेख चांद पी.जे., सुभाष भालेराव, सीताराम तुपे, ओमप्रकाश शिंदे, गोविंदप्रसाद मुंदडा, शेख नबी सिपारोकर आदींनी आपले मत व्यक्त केले. शेवट सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *