ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

प्राचार्य संभाजी पाटील यांचा अपघातात मृत्यू

February 16, 202214:35 PM 34 0 0

जालना (प्रतिनिधी ) स्वर्गीय अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य संभाजी पाटील यांना भरगाव वेगाने येणाऱ्या मोटरसायकल स्वराने उडवीले असून या अपघातात संभाजी पाटील यांचा जागेवर मृत्यू झाला आहे.

प्राचार्य संभाजी पाटील हे यशवंत नगर येथील आपल्या निवास स्थान कडून महाविद्यालयाकडे सकाळी जात असताना त्यांनी आपली कार न्यायालया समोर लावून रोडच्या दुसऱ्या बाजूने असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये काही पैसे घेऊन रोड ओलांडत असताना पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून येणाऱ्या मोटरसायकलस्वार उडविले यात त्यांच्या पोटाला जबर जखम झाली. त्यांना दवाखान्यात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. सदरील घटना सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. स्वर्गीय संभाजी पाटील यांच्या पार्थिवावर जालना येथील रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पालकमंत्री राजेश टोपे यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *