सातारा,(विदया निकाळजे) : प्राथमिक शिक्षक हे देशाची नवी पिढी घडविण्याचे काम करीत असतात.अनेक नैसर्गिक, भौतिक, सामाजिक समस्यांवर मात करत शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करीत असतात.त्यामुळे शिक्षकांच्या समस्या समजून घेऊन सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही माण जिल्हा सातारा पंचायत समितीचे नुतन सहाय्यक गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांनी दिली.
माण पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी भरत चौगले यांची प्रशासकीय बदली वडूज येथे झाली असून त्यांच्या जागी दहिवडी येथे पंचायत समिती वडूजचे सहाय्यक गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांची बदली झाली आहे. माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने श्री मेडेवार यांची भेट घेऊन त्यांचा स्वागत व सत्कार केला.
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे व्हा.चेअरमन महेंद्र अवघडे यांनी प्रास्ताविक केले तर आभार रामभाऊ खाडे यांनी मानले.यावेळी मोहनराव जाधव,सुरज तुपे, पुंडलिक खराडे, दत्तात्रय खाडे,अजिनाथ गलांडे व कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply