जालना (प्रतिनिधी)ः विकासाची कामे करतांना कोणतेही राजकारण न करता शहरातील प्रत्येक प्रभागात विकास कामांना प्राधान्य दिले आहे. सर्वाच्या सहकार्यामुळे शहराचा चौफेर विकास साधता आला असा विश्वास आ. कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे. जालना शहरातील प्रभाग क्रं. 19 ख्रिस्ती कॅम्प भीम नगर येथे भुमीगत गटार योजना, फिल्टर पाणी आणि सिंमेट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आ. कैलास गोरंट्याल व नगराध्यक्षा सौ. संगिताताई गोरंट्याल यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी युवानेते अक्षय गोरंट्याल, प्रभागाच्या नगरसेविका सौ. विनाताई सामलेटी, नगरसेवक आरेफ खान, मा. नगरसेवक बाळु रोडे, रॉबिन कमाने, मनोज ताल्हा, संजय पाखरे, वैभव निर्मल, अजय ,सचिन सोनू सामलेटी व आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना आ. गोरंट्याल म्हणाले की, जालना शहराच्या विकासाला आपण प्रथम प्राधान्य दिले असून राज्य शासन व शासनातर्फे राबविण्यात येणार्या विविध योजनाच्या माध्यामातून सिंमेट रस्ते, अंतर्गत जलवाहिनी, भुमीगट गटार योजना, शहरातील प्रमुख रस्त्याचे सिंमेटीकरण, चौकांचे सुशोभीकरण आदी कामाच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे सांगुन आगामी काळात देखील शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडुन मुबलक प्रमाणात निधी मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आ. गोरंट्याल यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षा सौ. गोरंट्याल यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, जालना नगर पालिकेच्या माध्यमातून शहरातील जनतेला मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आपण केला आहे. विकासांची कामे करतांना पक्षीय राजकारण आडवे न आणता सर्व पक्षीय नगरसेवकांना सोबत घेवून या सर्वाच्या सहकार्याने शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात स्वच्छतेसह मुबलक पाणी पुरवठा, अंतर्गत सिंमेट रस्ते, अंतर्गत जलवाहिणी, लाईट, भुमीगत गटार योजना आदी नागरी सुविधा देण्यावर भर दिल्याचे सांगुन या विकास कामाच्या माध्यमातून जनतेने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न आपण केल्याचे नगराध्यक्षा सौ. संगिताताई गोरंट्याल यांनी सांगितले. कार्यक्रमाचा प्रारंभी नगरसेविका सौ. विणाताई सामलेटी यांनी प्रास्ताविक करुन प्रभागातील समस्या मांडल्या यानंतर सौ. सामलेटी, सोनु सामलेटी व प्रभागातील नागरिकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास प्रभागातील नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Leave a Reply