जालना/प्रतिनिधी महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त अग्रवाल युवा मंचतर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषीक देण्यात आले. येथील हॉटेल बगडीयामध्ये 2 ऑक्टोंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात अग्रसेन दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून सत्यनारायण फत्तेपुरीया, पूसाराम अग्रवाल हे होते.
काल नचबलिये स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन पन्नालाल बगडिया यांनी केले. कार्यक्रमास अग्रवाल युवा मंचचे समितीचे सल्लागार विजय बगड़िया, सुभाष देवीदान,गोवर्धन अग्रवाल, इंदरचंद तवरावाला, सतिश पंच, संजय अग्रवाल, राजेश कामड, रमेशचंद्र अग्रवाल , सुनील सराफ, पुरुषोत्तम जयपुरिया, मनोज लाला, रूपम स्टीलचे राहुल अग्रवाल, शीतल अॅग्रोचे गोपाल अग्रवाल, रामधनी अॅग्रोचे परेश गजबी, सेवा समितीचे अध्यक्ष नरेश गुप्ता,अग्रवाल युवा मंचचे अध्यक्ष अंकित अग्रवाल, उपाध्यक्ष नितिन अग्रवाल, सचिव करण अग्रवाल, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम फतेहपुरिया, प्रभारी सचिव मोहीत गोयंका, सहसचिव आकाश गिंदोडीया,दीपक अग्रवाल, अतुल गिंदोडिया, गोपाल अग्रवाल आकाश तालुका , राहुल मित्तल,गोपाल पंच, अनुज पंच, परेश गजबी, साकेत कामड, अंकुश अग्रवाल, अल्केश अग्रवाल, यश अग्रवाल, हर्ष भरतीया, देवराज कामड, मयूर भरतिया व अग्रवाल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply