ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

September 1, 202113:38 PM 9 0 0

प्रतिनिधी(अनिता पवार जालना) :  दिनांक 31.08.2021  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, शिक्षण विभाग जिल्हा परिषद जालना आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना यांचे संयुक्त विद्यमाने, 2020-2021 मधे प्राथमिक, माध्यामिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटात जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धा घेण्यात आली होती.या स्पर्धमधे प्राथमिक स्तरावर सात आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर सहा उत्कृष्ट शिक्षकांची निवड करण्यात आली. पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये प्राथमिक स्तरावर श्री श्रीकांत अण्णासाहेब ढगे जि प प्रा शा मेव्हणा तालुका बदनापुर, श्रीमती नीता भास्‍कर आरसुळे प प्रा शा दोदडगाव तालुका अंबड, श्रीमती भाग्यश्री बाळासाहेब म्हसे , जि प प्रा शा किन्होळा तालुका बदनापुर,श्री हेमराज उमारावजी रमधम, जि प प्रा शा शिवणगाव तालुका घनसावंगी, श्री पिंटू विठ्ठल मेसनवाड, जि प प्रा शा दहिफळ भोगाने तालुका परतुर , ज्ञानेश्वर गणपत झगरे जि प प्रा शा उमरखेड तालुका भोकरदन, श्रीमती सोनाली मिलिंद खेरुडकर जि प प्रा शा घाणेवाडी तालुका जालना यांचा समावेश आहे.


तर माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर मनीषा पाटील, जि. प प्रशाला शेलगाव, कल्पना पाटील, डग्लस गर्ल्स हायस्कूल जालना, तुषार पडूळ सरस्वती विद्यामंदिर शेलुद, किशोर घायतडक मत्स्योदरी विद्यालय पिंपरखेड,भिमाशंकर शिंदे, शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय मूर्ती,श्री उत्तम धबाले लालबहादूर शास्त्री विद्यालय केंधळी यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील सर्व उत्कृष्ट नवोपक्रमशील शिक्षकांना जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.राजेंद्रजी कांबळे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.येवते सर, अधिव्याख्याता डॉ.राठोड मॅडम, डॉ.राख सर, डॉ.सातव सर डॉ.साखरे सर तसेच प्रमुख अतिथी अनंत चौधरी सर ,प्राचार्य वसंतराव नाईक अध्यापक महाविद्यालय यांचे हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
मुलांपेक्षा मुली सरस असल्याचे जाणवले तसेच नवोपक्रमामुळे 50% पेक्षा जास्त सहभाग वाढल्याचे ढगे सर यांनी प्रतिपादन केले. शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानातील दुरी कमी करायला उपक्रम उपयुक्त ठरतात असे मनीषा पाटील यांनी सांगितले.”पाठ्यपुस्तकपर आधारित कविता प्रतियोगिता” हा उपक्रम राबविला यामुळे विद्यार्थ्यांमध्ये हिंदी विषयाची गुरुची निर्माण झाली. हिंदी आणि मराठी भाषेतील उपचारांचा फरक त्यांच्या लक्षात आला असे कल्पना पाटील यांनी सांगितले. तर शाळेत आम्ही कोणताही उपक्रम राबवायचा म्हणून उपक्रम राबवत नाहीत तर समस्या येत गेल्या, आम्ही त्या समस्या सोडवत गेलो आणि यश मिळत गेले असे मेसनवाड सर यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रातील जालना जिल्ह्याचे आयसीटीचे भूषण श्रीकृष्ण निहाल यांचाही प्राचार्य राजेंद्रजी कांबळे यांचे हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे त्याचप्रमाणे ज्ञान हे रोज अद्ययावत होत असते म्हणून शिक्षकाला शिक्षण क्षेत्रामध्ये रोजचे रोज नव्याने विचार करणे गरजेचे आहे. तिला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता बदलणे हे शिक्षकाचे कार्य असल्याचे अनंत चौधरी सर यांनी सांगितले. तर आपल्या शाळेतील मुलांसाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांनी मुळेच आईचे नाव जिल्हास्तरावर आणि जिल्ह्याचे नाव राज्य स्तर तसेच राष्ट्रीय स्तरावर मोठे करणाऱ्या माझ्या शिक्षकांचा मला अभिमान आहे असे अध्यक्षीय समारोपात प्राचार्य राजेंद्र जी कांबळे यांनी गौरवोद्गार काढले.
या सोहळ्यासाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था जालना येथील सर्व कर्मचाऱ्यांसह साधन व्यक्ती विषय सहाय्यक आणि इतर शिक्षक वृंद ही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सो लाटे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन दराडे सर यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *